Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

कर्जाचे हप्ते थकले,गहुंजे मैदानावर बँक ऑफ महाराष्ट्रचा प्रतिकात्मक ताबा

Date:

पुणे-महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अखत्यारीत येणाऱ्या पुण्याच्या गहुंजे मैदानाचा, बँक ऑफ महाराष्ट्रने प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. मैदानाच्या निर्मितीसाठी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बँक ऑफ महाराष्ट्रकडून 69.50 कोटींचं कर्ज घेतलं होतं. मात्र या कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने ही कारवाई केल्याचं समजतं आहे. मात्र या कारवाईचा क्रिकेटवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सचिवांनी सांगितलं आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र, कर्नाटक बँक, बँक ऑफ बडोदा आणि आंध्र बँक या 4 शाखांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनला 69.50 कोटींचं कर्ज मंजूर केलं होतं. या बँकाच्या मंडळाचं नेतृत्व बँक ऑफ महाराष्ट्र करत असून, योग्य वेळेत हप्ते न भरल्यास मैदानाचा ताबा घेण्याशिवाय कोणताही पर्याय नसल्याचं बँकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सचिव रियाज बागवान यांनी नोटीस मिळाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मात्र या कारवाईचा महाराष्ट्राच्या संघाच्या सरावावर कोणताही परिणाम होणार नसल्याचं बागवान यांनी स्पष्ट केलं आहे.

सहारा इंडिया समुहाने महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनसोबत 215 कोटींचा जाहीरातींचा करार केला होता. मात्र सहारा समुहाने या करारातून माघार घेण पसंत केल्यामुळे असोसिएशनसमोर पैशाचा मोठा प्रश्न निर्माण झाला. यानंतर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने बीसीसीसीआय आणि क्रिकेट प्रशासकीय समितीला संघटनेच्या हिस्स्यातला निधी तात्काळ देण्याची विनंती केली आहे. सध्या असोसिएशनने 4.5 कोटी रुपये बँकेकडे भरले असून कारवाई टाळण्यासाठी असोसिएशनला तात्काळ 12 कोटींची गरज असल्याचं कळतंय.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

ज्येष्ठ सिने नाट्य अभिनेत्री लीला गांधी यांना जीवनगौरव पुरस्कार जाहीर

२४ ते २६ जून रंगणार बालगंधर्व रंगमंदिर वर्धापनदिन सोहळा पुणे...

कम ऑन किल मी.. आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरेंना एकनाथ शिंदे म्हणाले …. मरे हुए क्या मारना,मतदारांनीच तुमचा मुदडा पाडला

मुंबई: विधानसभा निवडणुकीतील कामगिरीची आकडेवारी सांगत उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे...

वारकऱ्यांची निःस्वार्थ सेवा म्हणजे पांडुरंगाचा प्रसाद:उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची भावना

वारकऱ्यांसाठी फिरता दवाखाना उपक्रमाचा शुभारंभ 'सिंबायोसिस' व सौ. शीला राज...

पुण्यात पाऊस सुरूच… मुठेत आता 15 हजाराचा विसर्ग

पुणे: शहर आणि परिसरात गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस...