मुंबई- राज्यसभेसाठी भाजपने अनुसूचित जाती-जमाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष अमर साबळे यांना उमेदवारी दिली आहे. साबळे हे भाजपचे जेष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडेंचे कट्टर समर्थक मानले जायचे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पिंपरी मतदारसंघातून त्यांना पक्षाने अर्ज माघारी घ्यायला सांगितला होता. भाजपने हा मतदारसंघ आठवले यांच्या आरपीआय पक्षाला सोडला होता.