पुणे : भाजप नगरसेवकांची गाऱ्हाणी मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार .. या खासदार संजय काकडे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना भाजपचे जुने जाणते नेते,आणि पालकमंत्री गिरीश बापट यांनी ,कोणीही… मुख्यमंत्रीच काय पण पंतप्रधानांच्या कानावरही गाऱ्हाणी घालू शकतो.. असे सांगत , आमच्या पक्षात लोकशाही आहे, तुम्हालाही काही गाऱ्हाणी घालायची असतील तर ती घालू शकता असे उत्तर आज महापालिकेत पत्रकारांच्या प्रश्नांवर बोलताना दिले .
खासदार संजय काकडे यांनी ,महापालिकेच्या कारभारात लक्ष घालण्याचा इशारा देताच , त्यांना रोखण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी आज आपली पावले महापालिकेकडे वळविली. खासदार काकडे यांनी आपल्याकडे नगरसेवकांची बैठक घेतल्यानंतर ,महापालिका आयुक्त आणि एकंदरीत कारभाराबाबत नगरसेवकांची गाऱ्हाणी असल्याचे म्हटले होते . आणि …तर मला महापालिकेत लक्ष घालावे लागेल असा इशारा जाहीरपणे दिला होता .यानंतर आपण महापालिकेत जातो आहे ,या दृष्टीने येणाऱ्या प्रश्नांचा सामोरा करण्याच्या तयारीनेच आज बापट पालिकेत आले.प्रथम त्यांनी उपमहापौर यांच्या कार्यालयात धावती भेट दिली . त्यानंतर पालिकेतील भाजपच्या पक्ष कार्यालयात ते गेले. बापट येणार म्हणून काकडे यांचे समर्थक पावणेपाच पासूनच इथे हजर होते . बापट आणि काकडे अशा दोहोंच्या समर्थकांची इथे गर्दी होती . मात्र यावेळी कोणत्याही नगरसेवकाने बापट यांच्यापुढे गाऱ्हाणी सांगितली नाही .बापट यांनीच आपण तुमच्या कामावर समाधानी असल्याचे सांगत ,आपण नगरसेवक असताना काय पद्धती होती हे सांगितले आणि दोन कार्यक्रम एकत्रित रित्या आता स्थायी समिती सभागृहात होणार आहे. त्यासाठी आल्याचे स्पष्ट करीत यामागे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसल्याचे यावेळी नगरसेवकांपुढे सांगितले.
“विधीमंडळाच्या अधिवेशनामुळे पुढील तीन आठवडे वेळ मिळणार नाही; म्हणून आलो असे सांगायलाही बापट विसरले नाहीत.
यावेळी पत्रकारांशी बोलताना पहा आणि ऐका बापट काय म्हणाले …