पर्वती मतदार संघ महायुती महामेळावा संपन्न
पुणे- लोकसभा मतदार संघाची महायुतीची उमेदवारी पुणे शहराचे पालकमंत्री गिरीष बापट यांना जाहीर झाल्यापासुन पुणे शहरात युतीच्या प्रचाराच्या बैठकिना वेग आला आहे. महायुतीतील सर्वच घटक पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह सर्वच कार्यकर्त्यांचे मतदारसंघ निहाय मेळावे पुण्यातील सर्व मतदार संघात आयोजित करणात येत आहेत. पर्वती मतदार संघाचा महायुतीचा मेळावा काल रात्री लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृहात पार पडला. या मेळाव्याला पर्वतीतील युतीच्या सर्वच घटक पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मेळाव्यात पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, भाजपा शहर अध्यक्ष योगेश गोगावले, भाजपा पुणे शहर सरचिटणीस दिपक उर्फ बाबा मिसाळ, माजी खासदार प्रदिप रावत, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे तसेच पर्वतीतील भाजपाचे सर्व नगरसेवक, शिवसेनेचे बाळासाहेब ओसवाल, अशोक हरणावळ, आरपीआय चे बाबुराव घाडगे व बाळासाहेब शेलार तसेच रासपचे बाळासाहेब पोकरे व स्वाती भातांब्रेकर यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
पर्वती मतदार संघ म्हणजे भाजपाला लोकसभेत सर्वाधिक मताधिक्य मिळवून देणारा मतदार संघ म्हणुन या मतदार संघाकडे पाहिले जाते. आमदार माधुरी मिसाळ यांच्या नेतृत्वाखाली मतदार संघात भाजपाचे २३ नगरसेवक निवडून आले आहेत.
“सर्वच घटक पक्षांचे पर्वतीत चांगले काम असल्यामुळे सर्वाना सोबत घेऊन प्रचाराचे काम करु आणि युतीच्या उमेदवाराला सर्वाधिक मताधिक्य पर्वतीतूनच मिळवून देवु” असा निर्धार आमदार मिसाळ यांनी या वेळी बोलून दाखवला. कार्यकर्त्याना मार्गदर्शन करताना बापटम्हणाले “संघटन, संघटना आणि सहभाग या तिनही बाबतीत पर्वती मतदार संघाचे काम उत्तम आहे. या ही निवडणुकीत पर्वती मतदार संघ सर्व जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडेल यात शंका नाही.”
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मतदार संघाचे अध्यक्ष हरीष परदेशी यांनी केले.