पुणे -नासाने प्रेक्षेपित केलेल्या उपग्रहाच्या निर्मितीत पुणेकर असलेल्या आनंद लालवाणी या विद्यार्थ्याने यशस्वी कामगिरी केल्याबद्दल त्याचे कौतुक होत आहे
आज या २२ वर्षीय आनंद ललवाणी याचा आहे. आज पत्रकार भवन येथे पत्रकार परिषदअभय छाजेड यांनी घेतली.
या प्रसंगी डॉ वासुदेव गाडे यांनी आनंद ललवाणी याचे पुष्पगुच्छ व शॉल देऊन स्वागत केले. या प्रसंगी अभय छाजेड, आनंद ललवाणी याची आई संगीत ललवाणी, वडील विकास ललवाणी उपस्थित होते.
आनंद ललवाणी आपले अनुभव सांगताना .. सदर उपग्रहाची निर्मिती करीत असताना अनेक अडचणींचा सामना करावा लागला मात्र त्यावर मात करून आमच्या विद्यार्थ्यांच्या गटाने या उपग्रहाची येशस्वी निर्मिती केली याचा आम्हाला आनंद आहे. विशेष म्हणजे अनेक गोष्टींचा पुनर्वापर आम्ही या वेळी या उपग्रहाची निर्मिती करताना केला आहे असे आनंद ललवाणी यांनी नमूद केले. आम्ही तयार केलेल्या या उपग्रहाला अत्युच्च क्षमतेचे सौरऊर्जेवर चालणारे एलईडी बसविण्यात आले असून अवकाशातून हा उपग्रह पाहणे व त्याची जागा निश्चित करणे शक्य होणार आहे. याचा उपयोग इतर उपग्रहांना जागा निश्चित करण्यासाठी होऊ शकेल.
” इक्कीसेंट ” या प्रकल्पासाठी एकूण ५ गट कार्यरत होते ज्यापैकी १७ विध्यार्थ्यांच्या गटाचे नेतृत्व हे आनंद ललवाणी यांच्या कडे होते. त्यांच्या टीमने मुख्यतः सोलर पॉवर आणि बॅटरी निर्मितेचे काम पहिले. सध्या आनंद इंजिनीरिंग रिसर्च असिस्टंट म्हणून ब्राउन युनिव्हर्सिटी येथे कार्यरत असून भविष्यात त्याला स्टॅनफर्ड विद्यापीठातून सोलर एनर्जी या विषयात पीएचडी चे शिक्षण घ्यायचे आहे.