घंटानाद करून ईव्हीएम चा केला निषेध
पुणे -वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाच्या वतीने “ईव्हीएम हटाओ देश बचाओ” अंतर्गत पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला .देशभरात ईव्हीएम विरोधात संशयाचे वातावरण आहे .लोकसभेच्या मतमोजणीच्या बेरजेतील तफावत बऱ्याच ठिकाणी आढळल्याचे विरोधी पक्षानेही आरोप केले होते .त्यामुळे वंचित आघाडीचे नेते ऍड.प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील 48 मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आज तीव्र स्वरूपाचे “घंटानाद आंदोलन” करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्यां त्यासह महिला ,युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यावेळी” ईव्हीएम हटाव देश बचाओ ” घोषणांनी परिसर दणाणून गेला होता .
या वेळी भारीपचे पुणे शहराध्यक्ष व वंचितचे समनव्यक अतुल बहुले यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले .या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड ,लष्कर ए भीमा ,रिपब्लिकन परिवर्तन आघाडी यासह विविध संघटनांनी या आंदोलनास पाठींबा दिला .
या आंदोलनात पुणे शहरातील आठही मतदारसंघातील युवक ,महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते .तरी या लोकशाही विरोधी ईव्हीएम मुळे मतदार व जनतेची फसवणूक झाली आहे याचा निषेध शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केला .
या आंदोलनात अतुल बहुले अध्यक्ष ,जेष्ठ नेते वसंत साळवे ,महिला अध्यक्ष शहरअनिता चव्हाण ,महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भालसेन,विलास वनशिव,नवनीत अहिरे ,अजित पानसरे,विकास चोरगे,प्रमोद कांबळे ,विकास चोरगे ,अजित वाघमारे ,सचिन शिंदे ,संदीप चौधरी ,सोमनाथ सर्वगौड ,गजेंद्र कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते