सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत क्रिशय तावडे, वेदांत जोशी, अचिंत्य कुमार यांची आगेकूच
पुण-पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या तर्फे व केपीआयटी यांच्या संलग्नतेने आयोजित 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील सहाव्या पीएमडीटीए-आयकॉन ग्रुप लिटिल कुमार चॅम्पियनशिप सिरिज 2019 स्पर्धेत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात क्रिशय तावडे, वेदांत जोशी, अचिंत्य कुमार या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
दिलीप वेडेपाटील स्पोर्ट्स अकादमी येथील टेनिस कोर्टवर सुरु असलेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 8 वर्षाखालील मुलांच्या गटात सातव्या मानांकित वेदांत जोशी व मनोन्मय शिंदे यांनी अनुक्रमे शौर्य गदादे व अधिराज दुधाने यांचा 5-2अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. पाचव्या मानांकित नील देसाईने अभिवीर उपाध्यायचा 5-0 असा सहज पराभव करून आगेकूच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 8 वर्षाखालील मुले:
मनोन्मय शिंदे वि.वि.अधिराज दुधाने 5-2;
ऋत्विज देशपांडे वि.वि.हर्ष परिहार 5-2;
क्रिशय तावडे वि.वि.साई उंडरे 5-1;
वेदांत जोशी(7) वि.वि.शौर्य गदादे 5-2;
अचिंत्य कुमार वि.वि.नील बोद्रे 5-3;
युगंधर शास्त्री(8)वि.वि.आर्यन बॅनर्जी 5-0;
नील देसाई(5)वि.वि.अभिवीर उपाध्याय 5-0.
मिहीर काळे वि.वि.आदित्य योगी 5-2.