पुणे-सोमेश्वर ङ्गाउंडेशन आणि शिवाजीनगर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या पंधराव्या पुणे आयडॉल गायन स्पर्धेचे तब्बल बारा तास बालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडलेल्या ५६७ स्पर्धकांतून अंतिम ङ्गेरीत पोहोचलेल्या ४६ स्पर्धकांत आदिती लोखंडे लिटल चॅम्प्स, सुधीर पटर्वन ओल्ड इज गोल्ड, अंजली पांगरे सर्वसाधारण आणि विश्वजीत कांबळे युवा हे पुणे आयडॉलचे विजेते ठरले. मुक्ता लिमये, काशिनाथ गायकवाड, निहार मयेकर, स्नेहा गायकवाड उपविजेते ठरले. यांना प्रत्येकी पंधरा व दहा हजार रुपये पारितोषिक व मानाचा मुगुट प्रदान करण्यात आला. लिटल चॅम्पसमधील तनिष वासुमलिक व युवा गटातील साहिल शेख यांना दहा व पाच हजार रुपयांचे उत्तेजनार्थ बक्षिस देण्यात आले. संयोजक आमदार विनायक निम्हण यांनी सर्वांचे स्वागत केले. महादेव निम्हण, अशोक मानकर, राहूल कदम, रणजीत अभिनकर, सुनील काशिद, नगरसेवक विशाल धनवडे, मधुरा वाळंज, सनी निम्हण यांच्या हस्ते बक्षिस वितरण करण्यात आले. जीतेंद्र भुरूक, मेधा चांदवडकर, जयश्री ओक, गङ्गार मोमीन यांनी परिक्षण केले. महेश गायकवाड यांनी निवेदन केले. उमेश वाघ, अनिकेत कपोते, हेमंत डाबी, प्रविण डोंगरे, अशोक काकडे यांनी संयोजन केले.