रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये महिला दिन साजरा !
पुणे :महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट मध्ये विद्यार्थी -विद्यार्थिनींनी केलेला खास ‘वूमेन्स डे स्पेशल केक ‘ कापून जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला ! प्राचार्य अनिता फ्रान्झ यांनी महिला दिनानिमित्त सर्वांचे स्वागत केले . यावेळी विद्यार्थी ,विद्यार्थिनी ,प्राद्यापक वर्ग उपस्थित होता . हा कार्यक्रम एम ए रंगूनवाला हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (आझम कॅम्पस ,पुणे कॅम्प ) येथे साजरा झाला .