अंजली कऱ्हाडकर यांनी ‘जननी ‘कार्यक्रमा अंतर्गत साहित्यातील अनेक व्यक्तिरेखा, स्वगते, नाट्यपदे, नाट्यछटा गाऊन व साभिनय सादर केल्या.
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन आयोजित ‘ जननी ‘ एकपात्री प्रयोगाला चांगला प्रतिसाद
साहित्य प्रकारातील आईच्या विविध रुपांचे घडले विश्वरूप दर्शन !
पुणे :भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन तर्फे सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत अंजली कऱ्हाडकर प्रस्तुत ‘ जननी ‘ एकपात्री प्रयोगाचे बुधवारी ,१२ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते .सरदार नातू सभागृह ,भारतीय विद्या भवन ,सेनापती बापट रस्ता येथे १२ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम झाला. त्याला रसिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला.
‘जननी ‘ म्हणजे आईची महती साहित्यातील विविध प्रकारांमध्ये वर्णिली आहे . कथा ,कादंबऱ्या ,कविता ,नाटक यामधील आईची रूपे मांडणारा हा आगळा वेगळा एकपात्री प्रयोग अंजली कऱ्हाडकर यांनी सादर केला.
भारतीय विद्या भवन -इन्फोसिस फाऊंडेशन च्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमातील हा ६३ वा कार्यक्रम होता. . हा कार्यक्रम विनामूल्य ,सर्वांसाठी खुला होता.
‘अनंतयुगाची जननी ‘हा समर्थ रामदासांच्या अभंगाने कार्यक्रमाचा आरंभ झाला . ‘ वीज म्हणाली धरतीला ‘ हा राणी लक्ष्मीबाईंचा वि .वा .शिरवाडकर लिखीत नाट्यप्रवेश अतिशय जोशपूर्ण आणि त्वेषात सादर झाला. बहिणाबाईंच्या ‘आज माहेराला जाणे ‘ या कवितेतून सासुरवाशिणीचे भावविश्व उलगडले.
नाट्य छटाकार दिवाकर यांची ‘ चिंगी महिन्याची ‘ ही नाट्य छटा त्यांनी सादर केली. सध्याचे युग हे स्पर्धेचे आहे तेंव्हा आताची आधुनिक माता कशाप्रकारे मुलांना विविध क्लास लावते, स्पर्धेत टिकण्यासाठी त्यावरील नाटिका सादर केली गेली.
मंगेश पाडगांवकर यांची ‘चिऊताई ‘ ही कविता सादर करण्यात आली.सुधा मूर्ति यांची ‘गौरम्मा ‘ ही रचना सादर झाली.
वसंत कानेटकर लिखित ‘ हिमालयाची सावली ‘आणि ‘अखेरचा सवाल ‘ हे नाट्य प्रवेश सादर झाले. बालगंधर्व यांचे ‘ नाही मी बोलत नाथा ‘ हे नाट्य पद गाऊन साभिनय सादर केले.
कार्यक्रमाची सांगता तुकाराम महाराजांच्या ‘ मायेविण बाळ ‘या अभंगाने झाली.
अंजली क-हाडकर यांना प्रांजली पाध्ये यांनी संवादिनीची तर अमित अत्रे यांनी तबल्याची साथ केली .
भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले