पुणे- महापालिकेच्या गेल्या वर्षाच्या आणि यंदाच्या वर्षाच्या बजेटवर राष्ट्रवादीच्या सुभाष जगताप यांनी जोरदार टीका केली . हे बजेट म्हणजे आयुक्त आणि चेअरमन ची पोपटपंची आहे . हे दोघे दीड शहाणे आहेत . अशी जोरदार टीका त्यांनी केली .
1)देशभरातील सर्व योजना २०२२ ला पूर्ण करणार ..बहुतेक भाजपने २०२२ ला मोठा मुहूर्त काढलेला दिसतोय …
2)चार वर्षात पंतप्रधान मोदी यांनी ४० कोटी पुणे शहरासाठी दिले आणि तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी १५०० कोटी शहरासाठी खर्च केले आता पुणेकरांनी ठरवावे ..कार्यक्षम कोण ?
3)पुणे महापालिकेचे गेल्यावर्षी चे अंदाजपत्रक मोहोळ यांनी मांडले तेव्हाच मी त्यांना सपनो का सौदागर म्हटले होते …ते बजेट १७०० कोटी ने फुगविलेले बजेट होते हा हि उल्लेख केला होता .. तसेच झाल्याचे स्पष्ट झाले आहे …
4)गेल्या वर्षीचे स्थायी समिती अध्यक्ष आणि आयुक्तांनी केलेलेभाषण म्हणजे पोपटपंची होती ..अंदाजपत्रकातील बहुसंख्य योजना फसव्या निघाल्या ..
5)त्यामुळे पुणेकर यांचा ‘थापेबाज ‘ म्हणून गौरव करतील … 6)चेअरमन आणि आयुक्त म्हणजे दोघेही साडेतीन शहाणे ..असे म्हणावे लागेल …
(महापालिकेच्या अर्थ संकल्प २०१८-१९ वरील सुभाष जगताप यांचे संपूर्ण ५१ मिनिटांचे भाषण https://www.facebook.com/MyMarathiNews/videos/2036689569907013/ या फेसबुक पेजवर पहा आणि ऐका)
इथे पहा आणि ऐका पहिल्या 11 मिनिटांची जोरदार झलक