चार सर्वोत्तम व्यवस्थापन इन्स्टिट्युटमध्ये सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंटचा समावेश
पुणे : जागरणजोश डॉट कॉमने पश्चिम भारतातील व्यवस्थापन संस्थांच्या केलेल्या क्रमवारीत सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटच्या सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटला पहिल्या चार सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन संस्थांमध्ये येण्याचा मान मिळाला आहे. जागरणजोश डॉट कॉम ही एक ‘इन्स्टिटयूट रँकिंग’संबंधित एकमेव निपक्ष आणि तटस्थ अशी सर्वेक्षण करणारी प्रणाली आहे. या सर्वेक्षणात भारतातील व्यावसायिक महाविद्यालयांच्या (बी-स्कुल) बाह्यगोष्टी विचारात घेतल्या गेल्या नाहीत, तर विद्यार्थी आणि उद्योगांच्या दृष्टिकोनातूनही विविध पैलूंचे विश्लेषण केले गेले आहे. ‘टाइम्स बी स्कुल’ क्रमवारीतही सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटने देशात ४२ वे स्थान पटकावले आहे. त्यामुळे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
‘सूर्यदत्ता’ दरवर्षी आपल्या गुणवत्तेत कमालीची वाढ करीत आहे. उद्योग क्षेत्राकडून मिळणारे सहकार्य व प्रोत्साहन, विद्यार्थ्यांची उल्लेखनीय गुणवत्ता आणि सूर्यदत्ता ग्रुपमधील सर्वानी घेतलेली प्रामाणिक मेहनत या जोरावरच संस्थेच्या प्रगतीचा आलेख चढता राहिला आहे. ‘सूर्यदत्ता’मध्ये अभ्यासाबरो बरच विद्यार्थ्यांना त्यांच्यातील क्षमतेनुसार विविध उपक्रमांत सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. शैक्षणिक आणि विविध उपक्रमातील सहभाग यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळते. आठवड्याला होणाऱ्या तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या कार्यशाळा आणि चर्चासत्रे यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडते. आजवर २५० पेक्षा जास्त नोबेल आणि पद्म पुरस्कार विजेत्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे.
सूर्यदत्ता शिक्षण संस्थेत शैक्षणिक कौशल्याच्या माध्यमातून कृती आणि विचारांतून स्वातंत्र्याची भावना रुजवली जाते. क्षेत्रभेटी, छोटे प्रकल्प, उद्योजकता विकास यातून विद्यार्थ्यांना स्व-कार्यक् षमतेसाठी मदत होते. सूर्यदत्ता इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कॅम्युनिकेशन (एसआयएमएमसी) महाविद्यालय अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद (एआयसीटीई) मान्यताप्राप्त आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्नित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र शासन व मनुष्यबळ विकास मंत्रालयाने गौरव केलेला आहे. ‘नॅक’च्या मानांकन यादीतही महाविद्यालयाचा समावेश आहे. गेल्या चार वर्षांपासून एआयसीटीई-सीआयआय संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात महाविद्यालयाला क्रमवारीत स्थान मिळालेले आहे.
सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी या यशाचे श्रेय टीमवर्कला दिले असून, सर्व संचालक, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे सातत्याने घेतलेल्या मेहनतीचे फळ असल्याचे म्हटले आहे.