पुणे-राजीव गांधी यांचे देशाप्रती विकासात्मक क्रांतीचे योगदान लक्षात घेता त्यांच्या 75 व्या जन्म वर्षाच्या पूर्वसंध्येस त्याच्या स्मृतीला उजाळा देण्यासाठी राजीव गांधी स्मारक समिती आणि गोपाळ तिवारी मित्र मंडळ, पुणे यांच्या वतीने पुण्यात 12 ऑगस्ट ते 20 ऑगस्ट दरम्यान राजीव गांधी जयंती सप्ताह साजरा करण्यात येणार आहे.
राजीव गांधी यांच्या विकासात्मक व क्रांतिकारक धोरणांची आणि निर्णयांची नागरिकांना व नव्या पिढीस माहिती देणे सत्य इतिहास सांगणे हाच हेतू असून रक्तदान, वृक्षारोपण राजीव गांधी यांच्या जीवन चरित्रावर छायाचित्र प्रदर्शन, रांगोळी प्रदर्शन व समाजप्रबोधनपर चर्चासत्र, व्याख्याने आयोजित केली जाणार असल्याचे गोपाळ तिवारी यांनी सांगितला आहे.
भारतीय लोकशाही पुढील आव्हाने यावर भालचंद्र मुणगेकर यांचे व्याख्यान त्याचप्रमाणे भारतीय इतिहासाचे विकृतीकरण यावर हेमंत देसाई यांचे व्याख्यान तर देशाची शस्त्रास्त्र खरेदी व पारदर्शकता यांच्यावर आनंद बागाईतदार यांचे व्याख्यान आयोजित केलेले आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस पक्ष आणि 2019 ची निवडणूक यावर व्यंकटेश केसरी यांचे चर्चासत्र आयोजित करण्यात आलेले आहे. तर मोदी सरकारची चार वर्ष यावर कुमार केतकर हे व्याख्यान देणार आहेत. त्याचप्रमाणे या सप्ताहाचा समारोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या देशापुढील आर्थिक आव्हान या चर्चासत्राने होणार आहे.