पुणे-बँक ऑफ महाराष्ट्र पुणे पूर्व अंचलच्या पुढाकाराने लोणीकाळभोर येथे स्वयं सहाय्यता बचत गट आणि शेतकर्यांसाठी किसान संपर्क अभियानाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमामध्ये बँकेच्या विविध कर्ज योजना आणि त्याबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
दिनांक 16 मार्च शनिवारी दुपारी 12 वाजता लोणीकाळभोर येथील जिजाऊ गार्डन्स येथे आयोजित या कार्यक्रमात बँकेचे कार्यकारी संचालक आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री हेमन्त टम्टा यांच्या हस्ते कृषी, लघुद्द्योग आणि स्वयं सहाय्यता बचत गटांना कर्ज मंजूरी पत्रे वितरित केली जाणार आहेत.
कार्यक्रमास 600 पेक्षा अधिक स्वयं सहाय्यता बचतगटांचे सभासद आणि शेतकरी उपस्थित रहाणार असून त्यांना कृषी कर्जांविषयी माहिती देवून मार्गदर्शन केले जाईल. याच कार्यक्रमात बँकेच्या यशस्वी ग्राहकांचा त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव करून सत्कार करण्यात येईल.
यावेळी कृषी कर्जदार आणि स्वयं सहाय्यता बचत गटांचे स्टॉल्स लावण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या प्रसिद्धीपत्रकामध्ये देण्यात आलेली आहे.