व्हॅस्कॉन गुडलाइफला (काटवी) सर्वसमावेशक ब्रँड कॅम्पेन आणि बजेट हाउसिंग प्रोजेक्ट ऑफ द इयर पुरस्कार
व्हॅस्कॉनचे विपणन प्रमुख नवीन ठाकूर यांना बेस्ट मार्केटर पुरस्कार
पुणे- – पुण्यातील सर्वात विश्वासार्ह आणि प्रसिद्ध डेव्हलपर व्हॅस्कॉन इंजिनियर्स लिमिटेडने (बीएसई स्क्रिप आयडी व्हॅस्कॉनईक्यू), पुण्यात नुकत्याच आयोजित करण्यात आलेल्या
१० व्या रिअलिटी प्लस एक्सलन्स पुरस्कार २०१९ मध्ये तीन पुरस्कार पटकावले आहेत. काटवी येथील व्हॅस्कॉनच्या गुडलाइफ प्रकल्पाला ‘बजेट हाउसिंग प्रोजेक्ट ऑफ द इयर’ पुरस्कार मिळाला आहे. सर्व माध्यमांतील सर्वोत्तम व्याप्तीसाठी ‘सर्वसमावेशक ब्रँड कॅम्पेन ’ पुरस्कारही गुडलाइफ प्रकल्पाने मिळवला आहे. व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.चे विपणन प्रमुख नवीन ठाकूर यांनी बेस्ट मार्केटर पुरस्कार जिंकला आहे.
या कामगिरीबद्दल व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सिद्धार्थ वासुदेवन म्हणाले, ‘१० व्या रिअलिटी प्लस एक्सलन्स पुरस्कार २०१९ मध्ये विविध पुरस्कार मिळवल्याचा आम्हाला अतिशय आनंद झाला आहे. तीन दशकांचा वारसा लाभलेल्या व्हॅस्कॉनने कायमच ग्राहकांना त्यांच्या पैशांचे मूल्य देणारी दर्जेदार उत्पादने पुरवली आहेत आणि हे पुरस्कार आमची बांधिलकी व इतक्या वर्षांत उभारलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.’
व्हॅस्कॉन इंजिनियर्स लि.बद्दल
व्हॅस्कॉन इंजिनियर्स ही आघाडीची नोंदणीकृत स्थावर मालमत्ता कंपनी असून तिचे मुख्यालय पुण्यात आहे. ३० वर्षांचा अनुभव असलेल्या या कंपनीने आतापर्यंत ५० दशलक्ष चौरस फुटांचे मिळून एकूण २०० पेक्षा जास्त प्रकल्प तयार केले असून निवासी, औद्योजिक, आयटी पार्क्स, मॉल्स व मल्टीप्लेक्सेस, हॉस्पिटॅलिटी आणि कम्युनिटी वेल्फेयर सेंटर्सचा समावेश आहे. हे प्रकल्प भारतातील ३० पेक्षा जास्त शहरांत ईपीसीसह उभारलेले तसेच कंपनीचे स्वतःचे स्थावर मालमत्ता प्रकल्प आहेत. यापुढेही ईपीसी आणि परवडणाऱ्या घरांच्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करण्याचे धोरण कंपनीने ठेवले आहे.