कलेचा तंत्रज्ञानाशी मेळ (सिनेमात व प्रत्यक्षात)
अक्षय कुमार यांची स्वाक्षरी असलेल्या एक्स-ब्लेड मोटरसायकलमुळे 2.0बद्दलच्या उत्सुकतेत वाढ
चेन्नई: होंडा 2व्हीलर्स या भारतातील सर्वात विश्वासार्ह टू-व्हीलर ब्रँडने ‘2.0’ या मोठ्या प्रतीक्षेच्या 3डी सिनेमाबरोबरचा आपला सहयोग साजरा केला.
होंडा मशीनमध्ये तंत्रज्ञानाच्या बाबतीतील सक्षमतेबरोबर कलात्मकता आहे आणि या सहयोगामुळे, कला व तंत्रज्ञान यांचा विहंगम संगम असलेले उत्कृष्ट व्हीएफएक्स खऱ्या अर्थाने उठून दिसणार आहे.
रजनीकांत यांची प्रतिकृती असणारा चिट्टी आणि होंडाचा ब्रँड अम्बेसेडर अक्षय कुमार 2.0 मध्ये स्क्रीन उजळून टाकणार असल्याचे पाहण्यासाठी सज्ज व्हा.
होंडा भारतात 2.0 ची लोकप्रियता आणखी वाढवणार आहे. चित्रपट प्रदर्शित होण्याची तारिख जवळ येत असल्याने (29 नोव्हेंबर 2018), अक्षय कुमार यांची स्वाक्षरी असलेली एक्स-ब्लेड मोटरसायकल होंडा टचपॉइंट्समध्ये 2.0 चाहत्यांसाठी खास करून उपलब्ध असणार आहे.
याविषयी बोलताना, होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे सेल्स व मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया म्हणाले – “तंत्रज्ञानाच्या वापराच्या बाबतीत, 2.0 (#2Point0) आणि होंडा यांच्यामध्ये बरेच साम्य असल्याचे आम्हाला आढळले आहे. 2.0 या भारतीय सिनेमातील भव्य व अविस्मरणीय अनुभवाला चालना देणारा या चित्रपटविषयक सहयोग म्हणजे होंडाच्या जॉय ऑफ फन रायडिंगचा जणू विस्तार आहे. 2.0च्या सर्व चाहत्यांना, विशेष स्वाक्षरी असलेल्या एक्स-ब्लेड मोटरसायकलमुळे होंडाच्या डीएनएचा अनुभव घेता येणार आहे. त्यामुळे, 2.0च्या निमित्ताने, ग्राहकांना सहभागी करण्याच्या होंडाच्या प्रयत्नांमध्ये भाग घ्या.”
ग्राहकांसाठी ऑनलाइन व ऑन-ग्राउंड कार्यक्रम आयोजित करून विविध टचपॉइंटवर ग्राहकांना उत्कृष्ट अनुभव देण्याच्या दृष्टीने, होंडा 2.0 मधील विशेष कण्टेण्टचे अनावरण करणार आहे. या सहयोगाच्या निमित्ताने सुपरबाइक व सुपरहीरो एकत्र आले असल्याने हा सहयोग म्हणजे भारतीय सिनेमासाठी एक महत्त्वाची घटना आहे.