प्रत्येक मालिका किंवा सिनेमा यांच तसं पाहाल तर इनडोअर आणि आउटडोअर शूट होतंच असतं. तर मग काय नवीन आहे या तू अशी जवळी राहा च्या न्युज मध्ये … तर यात एक मजेशीर गोम आहे. हे आऊटडोअर शूट झालंय मुंबई च्या रस्त्यांवरच पण कोणाच्याही नकळत. म्हणजे हे शूट करताना कोणत्याही प्रकारचा गाजावाजा नव्हता की मोठ्मोठायला व्हॅनिटी व्हॅन्स नव्हत्या. भर रस्त्यात गो प्रो कॅमेराच्या मदतीने हे चित्रीकरण केले गेले. कोणालाही त्रास न देता, अतिशय साधेपणाने हे शूट केले गेले. गेट वे ऑफ इंडिया, नरिमन पॉईंट, गिरगांव चौपाटी आणि महालक्ष्मी मंदिर अश्या मुंबईतील प्रेक्षणीय स्थळांवर हे चित्रीकरण केले गेले . या चित्रीकरणात सिद्धार्थ आणि मनवा दोघांनीही भरपूर मजा केली. नरिमन पॉईंट च्या कट्टयावर उभे राहून चालणे, समुद्र पाहत तिकडच्या फेरीवालयाकडून चहा पिणे, तिथे एकमेकांचं फोटोशूट करणे , महालक्ष्मी च्या देवळात ओटी भरणे , गेटवे ऑफ इंडिया ला एखाद्या नॉर्मल जोडप्या प्रमाणे फिरणे अशी बरीच मजामस्ती या दोघांना या चित्रीकरणात करता आली . शूट करताना लागणाऱ्या सगळ्या महत्वाच्या गोष्टींची काळजी घेण्यात आली आणि त्याचबरोबर ह्या शूट चा कोणालाही त्रास नाही होणार हे सुद्धा पहिले गेले.
झी युवावर सोमवार ते शनिवार रोज संध्याकाळी ७ वाजता सिद्धार्थ बोडके आणि तितिक्षा तावडे यांच्या अभिनयाने भरलेली आहे.प्रियकराच्या आपल्या प्रियसेवरील वेड्या प्रेमावर आधारित ‘तू अशी जवळी राहा’ही मालिका महाराष्ट्रात खूप पसंत केली जाते . सध्या या मालिकेत राजवीर आणि मनवा यांचे लग्न झाले असून या दोघांच्या एकमेकांवरील प्रेमाचे क्षण त्यांच्या ‘डेट ‘द्वारे या चित्रीकरणात टिपण्यात आले . . झी युवा वाहिनीवरील हा कार्यक्रम बघत राहण्यासाठी ३९ रुपयांचा ‘ झी फैमिली पॅक’ नक्की निवडा…या मध्ये तुमचे मनोरंजन करण्याऱ्या २० झी वाहिन्या आपल्याला पाहायला मिळतील.