संगीत, नृत्य, कला, गायन, वादन यांचा मिलाफ असलेला ‘पुणे महोत्सव’ रविवार १७ सप्टेंबर २०१७ ला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर पहायला मिळणार आहे . मराठी इंडस्ट्रीतील अनेक नामवंत कलाकारांच्या परफॉर्मन्स या कार्यक्रमात आहेत . सुबोध भावे , सोनाली कुलकर्णी , मानसी नाईक , संस्कृती बालगुडे , सागर कारंडे , विशाखा सुभेदार , समीर चौगुले , मिलिंद शिंतरे , विजय पटवर्धन , मयुरेश पेम , प्राजक्ता माळी , तेजस बर्वे , ज्ञानदा रामतीर्थकर , रेशम प्रशांत आणि संगीत सम्राटाचे स्पर्धक पुणे महोत्सवात स्वतःची कला सादर करणार आहेत . प्रेक्षकांची रविवार संध्याकाळ मनोरंजित करण्यासाठीच झी युवा ही वाहिनी ‘पुणे महोत्सव ‘हा एक अतिशय उत्तम दर्जाचा कार्यक्रम घेऊन आलेली आहे.
झी युवा च्या ‘पुणे महोत्सव’ चे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे , या महोत्सवाच्या निमित्ताने झी युवा खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान करणार आहे . ५ गुणवान युवतींचा ज्यांनी त्यांच्या आयुष्यात स्व कर्तृत्वावर स्वतःचे नाव कमावले अश्या प्रणिती शिंदे ( महिला राजकारणी ) , पूर्वा बर्वे ( बॅडमिंटन प्लेअर ) , गौरी गाडगीळ ( कलाकार ) , ऋतुजा केकावळे ( विद्यार्थी ) , कृष्णा पाटील ( एव्हरेस्टवीर महिला गिर्यारोहक ) यांचा मानपत्र देऊन गौरव करण्यात आला आहे . रविवार १७ सप्टेंबर २०१७ ला संध्याकाळी ७ वाजता झी युवावर मराठी कलाकाराच्या अदाकारीने रंगलेला आणि महाराष्ट्रातील गुणवान युवतींचा सन्मान सोहळा प्रदर्शित होणार आहे .