पुणे- आमदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या सहकार्याने व नवनाथ शेटे स्पोर्टस् अकादमी तर्फे आयोजित एआयटीए, एमएसएलटीए व पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या 25000डॉलर पुणे ओपन आयटीएफ महिला अजिंक्यपद टेनिस स्पर्धेत उपांत्यपुर्व फेरीत भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईने युक्रेनच्या चौथ्या मानांकीत वालेरीया स्त्राखोवाचा पराभव करत उपांत्यफेरीत प्रवेश केला.
एमएसएलटीए स्कुल ऑफ टेनिस, श्री शिवछ्त्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत एकेरी गटात उपांत्यपुर्व फेरीत एक तास दहा मिनिट चाललेल्या सामन्यात भारताच्या बिगर मानांकीत झील देसाईने युक्रेनच्या चौथ्या मानांकीत वालेरीया स्त्राखोवाचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्यफेरी गाठली. भारतच्या तिस-या मानांकीत कारमान कौर थंडीने आपल्या कामगिरीत सातत्य राखत मोन्टेनेग्रोच्या सहाव्या मानांकीत एना वेसेलीनोवीकचा 6-2, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुस-या मानांकीत रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन हीने स्लोवाकीयाच्या आठव्या मानांकीत तेरेझा मिहालीकोवाचा 7-6(2), 6-2 असा टायब्रेकमध्ये पराभव केला.
दुहेरी गटात उपांत्य फेरीत चायनीज तायपेच्या पी-ची ली व रशियाच्या याना सिझीकोवा या जोडीने भारतच्या झील देसाई व थायलंडच्या बुनयावी थामचायवात यांचा 3-6, 6-2, 10-2 असा तीन सेटमध्ये पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीच्या दुस-या लढतीत रोमानीयाच्या जॉकलीन अदिना क्रिस्टीन व स्लोवाकीयाच्या तेरेझा मिहालीकोवा यांनी तुर्कीच्या बेरफु सेंग्झी व स्वित्झरलॅंडच्या करीन केनेल यांचा 6-0, 6-1 असा सहज पराभव करत अंतीम फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- एकेरी गट- उपांत्यपुर्व फेरी
जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया,2) वि.वि तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,8) 7-6(2), 6-2
कारमान कौर थंडी(भारत,3) वि.वि एना वेसेलीनोवीक(मोन्टेनेग्रो,6) 6-2, 7-5
झील देसाई(भारत) वि.वि वालेरीया स्त्राखोवा(युक्रेन,4) 6-3, 6-2
बुनयावी थामचायवात(थायलंड) वि.वि करीन केनेल(स्वित्झरलॅंड) 6-2, 6-3
दुहेरी गट- उपांत्य फेरी
पी-ची ली(चायनीज तायपे)/ याना सिझीकोवा(रशिया,3) वि.वि झील देसाई(भारत)/ बुनयावी थामचायवात(थायलंड) 3-6, 6-2, 10-2
जॉकलीन अदिना क्रिस्टीन(रोमानीया)/ तेरेझा मिहालीकोवा (स्लोवाकीया,4) वि.वि बेरफु सेंग्झी(तुर्की)/ करीन केनेल(स्वित्झरलॅंड) 6-0, 6-1