पिंपरी :-मुलांच्या सीबीएसई क्लस्टर फुटबॉल स्पर्धा २०१७ नुकतीच पिंपरी येथे संपन्न झाली. १२ ते १५ ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडली. अंडर १७ची फायनल ट्रॉफी नेव्ही चिल्ड्रेन स्कूल मुंबईने तर अंडर १९ ची फायनल ट्रॉफी रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा यांनी जिंकली.
यात अंडर १७ चे ७९ संघ आणि अंडर १९चे ३८ संघ असे एकूण ११७ संघ यात सहभागी झाले होते. यात महाराष्ट्रातील आणि गोव्यातील सीबीएसईच्या शाळांचा समावेश आहे.गोयल गंगा इंटरनैशनल स्कूल या स्पर्धेचे यजमानपद भूषवले असून ते या स्पर्धेत सहभागी देखील झाले.
अंडर १७ गटात अटीतटीच्या या लढतीत नेव्ही चिल्ड्रेन स्कूलने ४-२ अशा फरकाने आर्मी पब्लिक स्कूलला तर अंडर १९ गटात मध्ये जोसेफ हायस्कूल पनवेल ला ३-० रायन इंटरनॅशनल स्कूल सानपाडा यांनी मात दिली.
अंडर १७ गटात नेव्ही चिल्ड्रेन स्कूलच्या रोहित पांडे याला तर अंडर १९च्या गटात रायन इंटरनॅशनल स्कूलच्या सिद्धार्थ येवले याला सर्वोत्तम खेळाडूचे पारितोषिक मिळाले.
यावेळी टेबल टेनिस विजेते भूषण ठाकूर, बुद्धीबळ ग्रँड मास्टर अभिजित कुंटे, सीबीएसई बोर्डाचे अधिकारी दीपक म्हेत्रे, रवी पिल्लई तसेच गोयल गंगा इंटरनैशनल स्कूलच्या मुख्याध्यापिका भारती भागवानी देखील या प्रसंगी उपस्थित होते.