पुणे: नवनाथ शेटे स्पोर्ट्स अकादमी यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या फिनआयक्यू करंडक एमएसएलटीए राज्य मानांकन 10 वर्षाखालील टेनिस स्पर्धेत आदित्य योगी, मिहीर कदम, अंशूल पुजारी, विरेन चौधरी या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून आगेकूच केली.
मेट्रोसिटी स्पोर्ट्स क्लब, आयडियल कॉलनी, कोथरूड येथील टेनिस कोर्ट येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या फेरीत 10 वर्षाखालील मुलांच्या गटात आदित्य योगीने निहाल तुराकियावर 6-5(5) असा संघर्षपूर्ण विजय मिळवला. मिहीर कदम याने कुशाग्रा बेडेकरचा टायब्रेकमध्ये 6-5(3) असा पराभव केला. विरेन चौधरी व अंशूल पुजारी यांनी अनुक्रमे अचिंत्य कुमार व आरव मुळे यांचा 6-3 अशा सारख्याच फरकाने पराभव करून दुसरी फेरी गाठली. अर्जुन परदेशी याने शौर्य बोऱ्हाडेला 6-0 असे पराभूत केले.
स्पर्धेचे उदघाटन फिनआयक्यूच्या क्रीडा समितीचे चेअरमन राजवीर सिंग यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक नवनाथ शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: पहिली फेरी: 10 वर्षाखालील मुले:
विरेन चौधरी वि.वि.अचिंत्य कुमार 6-3;
राम मगदूम वि.वि.रोहन बोर्डे 6-0;
आदित्य योगी वि.वि.निहाल तुराकिया 6-5(5);
मिहीर कदम वि.वि.कुशाग्रा बेडेकर 6-5(3);
अंशूल पुजारी वि.वि.आरव मुळे 6-3;
अथर्व येलभर वि.वि.रिषभ मोदी 6-1;
अर्जुन परदेशी वि.वि.शौर्य बोऱ्हाडे 6-0;
क्षितिज अमीन वि.वि.श्रेय भोर 6-3;
वेदांत खानविलकर वि.वि.कारव शाह 6-1.