पुणे- देशाच्या राजकारणातील दिग्गज आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि २०१४ पूर्वी गुजरात मध्ये जाऊन पतंगबाजी करून नरेंद्र मोदींशी संपर्कात असल्याच्या चर्चेला कारणीभूत ठरलेला हिंदी सिनेसृष्टीतील आघाडीचा सुपरस्टार सलमान खान आता २०१९ मध्ये म्हणजे उद्याच्या रविवारी, 10 फेब्रुवारीला पुण्यात एकत्र दिसणार आहेत . अर्थात यावेळी ते पतंग उडविणार नाहीत तर गरजू मुलींना मोफत सायकलीचे वाटप करणार आहेत ,ते हि चक्क 6 हजार मुलींना … अर्थात यावेळी खासदार सुप्रिया सुळे ,टाटा ट्रस्टचे व्यंकटरमण हे दिखील उपस्थित राहणार आहेत
राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि कार्यक्रमाचे निमंत्रक प्रकाश कदम यांनी या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे .कात्रज कोंढवा रस्त्यावरील शिवगोरक्ष मैदानावर हा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मंडप ..तसेच 6 हजार सायकलीचे सुटे भाग येथे आणण्यात आले असून ते जोडून मजबूत सायकली बनविण्याचे काम हि वेगाने सुरु होते जे आज अंतिम टप्प्यात आले होते .
टाटा ट्रस्ट, पवार पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट तसेच मेंटर्स फाऊंडेशन च्या संयुक्त विद्यमाने बारामती, दौंड, इंदापूर, भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, हवेली आणि खडकवासला मतदार संघातील शालेय विद्यार्थिनी आणि आशा वर्कर्स यांना शरद पवारांच्या हस्ते मोफत सायकल वाटप होणार असलेल्या या कार्यक्रमात अभिनेता सलमान खान ची उपस्थिती राजकारणात आणि सिनेसृष्टीसह तमाम महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणार आहे . सलमान खान यांनी गुजरात मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मोदींच्या समवेत केलेल्या पतंगबाजी नंतर राजकारणात सत्तांतराचे वादळ उठले होते .आता शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या समवेत पुण्यात सलमान पतंगबाजी करणार नाही तर गरजू ६००० मुलींना सायकलवाटप सोहळ्यात सहभागी होणार आहे .