रेसिडेन्सी क्लबचा पुणे प्राईड अवाॅर्ड समारंभ संपन्न
पुणे, : रेसिडेन्सी क्लबला २५ वर्षे पूर्ण होत असून हा दिवस साजरा करण्यासाठी पुणे प्राईड अॅवार्ड प्रदान समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्यांच्यामुळे पुणे शहराचे नाव अभिमानाने घेतले जाते अशा अष्टपैलू व्यक्तींना हा पुरस्कार देण्यात आला. ब्रम्हा काॅर्प लि.चे अध्यक्ष आर. के. अग्रवाल यांच्या द्वारा खेळ, उद्योग, कला व शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात कामगिरी केलेल्या व्यक्तीमत्वांना गौरविण्यात आले.
अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत केले आणि उपस्थित मान्यवरांची ओळख करून दिली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला उपस्थित होत्या. शुक्ला यांनी या समारंभाचे कौतुक केले तसेच आर. के. अग्रवाल यांनी हा समारंभ आयोजिल्याबद्दल त्यांचे देखील कौतुक केले. ज्यामुळे विविध क्षेत्रात कतृत्वान कामगिरी केल्य़ाबद्दल गौरविण्यात आले.
यावेळी सल्लागार मंडळाचे अध्यक्ष बाहरी बी. आर. मल्होत्रा, लीला पूनावाला, सबीना संघवी, विठ्ठल मनियार, कर्नल संभाजी पाटील, डाॅ. के. एच. संचेती, डाॅ. मोहन आगाशे, चंद्रकांत बोरडे आणि व्ही. एम. म्हस्के आदी उपस्थित होते.
पुरस्काराचाच एक भाग म्हणून देशासाठी वीर मरण आलेल्या सैनिकांना देखील पुरस्कार देण्यात आला. ‘वीर नारी’ या उपक्रमांतर्गत सैनिकांच्या घरी शिवणकाम करण्यासाठी मशीन देण्यात आली.
पुरस्कार व पुरस्काराचे मानकरी
खेळ- बाळासाहेब लांडगे
कला व संस्कृती- मृणाल कुलकर्णी
शैक्षणिक – एन. एम. जोशी
उद्योग – रंजीत मोरे
समाजकार्य – संजय नहार
जीवनगौरव – डॅरियस फाॅर्बज्