पुणे- शिवजयंती चे औचित्य साधून आज परशुरामियन्स अडव्हेन चर क्लब तर्फे स प महाविद्यालयातील 35 विद्यार्थ्यांनी ‘किल्ले गड स्वच्छ करू या’ हा संकल्प घेत तोरणा गडा वर स्वच्छता मोहीम राबविली
या वेळी गडावर जाणाऱ्या मार्गातील प्लास्टिक कचरा गोळा केला, 9 पोती भरून हा कचरा विद्यार्थ्यांनी गोळा केला, उद्या शहरात सर्वत्र ध्वनी प्रदूषण करणाऱ्या स्पीकर च्या भिंती वाजणार, त्या पेक्षा या तरुण पिढीला प्रत्यक्ष शिवाजी महाराजांनी जिथे स्वराज्याचे तोरण बांधले त्या तोरणा गडावर नेऊन, इतिहासाचे शिक्षक राहुल मेश्राम यांनी इतिहासाचे पुरावे माहिती सह या तरुण पिढीला दाखवून त्यांच्या मनात खऱ्या अर्थाने आत्मविश्वास आणि महाराजांचे कर्तुत्व जागे करण्याचा प्रयत्न केला , ही मोहीम पूर्ण करण्या साठी प्रथमेश टिंगरे,प्रतीक सुरवसे,दहिराज यादव,शुभम घाडगे, सानिका शाह, संजना जाधव , लोकेश यांनी विशेष सहकार्य केले,राहुल मेश्राम गेली कित्येक वर्षे आपल्या विद्यार्थ्यांसह गड किल्ले भ्रमंती करत तेथील ऐतिहासिक माहिती चा प्रचार करत अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवीत आहेत .आजवर त्यांचा हा छंद त्यांनी सातत्याने जोपासला आहे.विद्यार्थी येतात आणि पुढे मार्गक्रमण करीत निघून जातात पण सरांचा छंद ..अजूनही नित्याने ते जोपासत आहेत .