पश्चिम भारतातील रेस्टॉरन्ट व्यवसाय २०२१ पर्यंत २५ हजार कोटींचा पल्ला गाठणार – रेस्टॉरन्ट इंडिया
पुणे – पश्चिम भारतातील क्विक सर्व्हिस रेस्टॉरन्टची (क्यूएसआर) बाजारपेठ वेगाने वाढत आहे. २०२१ पर्यंत येथील रेस्टॉरन्ट व्यवसाय २२ टक्क्यांनी वाढून २४ हजार ६६५ कोटी रुपयांपेक्षाही जास्त पल्ला गाठण्याची शक्यता आहे. देशातील पश्चिम भागात क्यूएसआर रेस्टॉरन्टचे जाळे तुलनेने जास्त असून हा भाग देशातील तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांसाठी सर्वात्तम बाजारपेठ बनला आहे. रेस्टॉरन्ट इंडिया २०१७ या कार्यक्रमात अ बाईट ऑफ वेस्ट इंडिया – इनोवेशन विथ ग्रोथ या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
वाढलेली कमाई आणि वेळेच्या कमतरतेमुळे भारतामध्ये बाहेर जेवण्याचे प्रमाण लक्षणीयरित्या वाढले आहे. सर्व बाबींचा विचार केल्यास भारताच्या जीडीपीचा ६० टक्के वाटा या व्यवसायात आहे. अनेक आंतरराष्ट्रीय तसेच देशातील साखळी रेस्टॉरन्ट्स आपल्या व्यवसायासाठी देशाच्या पश्चिम भागाला प्राधान्य देतात. देशातील एकूण ३० रेस्टॉरन्ट्स आणि ४५ टक्के कॅफे हे याच भागात आहेत. विशेष म्हणजे, पुढील पाच वर्षांत पब, बार कॅफे आणि लाऊंजेस व्यवसाय २२ टक्क्यांनी वाढेल अशी अपेक्षा आहे.
याबाबत बोलताना फ्रॅन्चाईस इंडियाचे चेअरमन गौरव मारिया म्हणाले, पश्चिम भारतातील रेस्टॉरन्ट बाजारपेठ ही अनेक मोठ्या ब्रॅन्ड्सना विस्तार करण्यासाठी खुणावत आहे. त्यामुळे रेस्टॉरन्ट मालकांनी चांगल्या भागातील बाजारपेठांचा शोध घ्यावा. व्यवसाय वाढीसाठी त्यांनी थोडीशी चपळ वृत्ती दाखवण्याची गरज आहे.
(टीप – रेस्टॉरन्ट इंडिया हा फ्रॅन्चाईस इंडियाचा एक भाग आहे.)
देशाच्या पश्चिम भागातच नाईट लाईफ पहिल्यांदा पाहायला मिळत आहे. हे क्षेत्र नामशेष झालेल्या इराणी तसेच समुद्री खाद्यप्रकारांसह मराठी व स्थानिक आवडत्या खाद्यप्रकारांचे माहेरघर आहे.
रेस्टॉरन्ट्स व्यवसाय लोकांना आकर्षित करत असतात. रेस्टॉरन्ट काँग्रेसच्या या कॉन्फरन्समुळे अशा लोकांना या व्यवसायातील बारकावे अनुभवींकडूनच समजू शकतात. ही कॉन्फरन्स अनेकांना व्यवसायाबाबतचा आपला अनुभव तसेच ज्ञान वाटण्याची संधी देते, असे मत डेगिस्बस हॉस्पिटॅलिटीचे सीईओ अनुराग कटरियार यांनी व्यक्त केले.
इम्प्रेसेरियो एंटरटेनमेंट अॅन्ड हॉस्पिटॅलिटीचे सीईओ व व्यवस्थापक रियाज अमलानी यांनीही आपले विचार मांडले. ते म्हणाले, खाद्य व्यवसाय दरवर्षी ७ टक्क्यांनी वाढत आहे. पुढील ३ वर्षांत हा व्यवसाय १० टक्क्यांनी वाढेल अशी शक्यता आहे. रेस्टॉरन्ट काँग्रेस आपल्या कल्पना मांडण्यासाठी एक चांगले व्यासपीठ आहे.
इंडियन रेस्टॉरन्ट काँग्रेस हे कॉन्फरन्स म्हणजे विविध रेस्टॉरन्टसाठी व खाद्य व्यावसायिकांसाठी एक पर्वणी होती. देशातील ४ विविध भागातून रेस्टॉरन्ट व्यवसायाची चर्चा करण्यासाठी याठिकाणी आले होते. यामध्ये ३०० रेस्टॉरन्ट मालक ५० पेक्षा जास्त रेस्टॉरन्ट्स उद्योजक त्यांच्या शेफसह आले होते. यामध्ये रियाज अमलानी यांच्यासह फुलिंक सर्व्हिसचे संजय वजिरानी, क्रेमिका फुड इंडस्ट्रीचे अक्षय बेक्टर, शेफ विकी रत्नानी, शेफ हरपाल सिंग सोखी, डेगिस्बस हॉस्पिटॅलिटीचे अनुराग कटरियार, बर्गर किंगचे तन्मय कुमार यांनी आपला सहभाग नोंदवला.