पुणे- वाहतूक समस्येवर आज महापालिका सभेतील बैठकीत नगरसेवक अविनाश बागवे आणि अप्पा रेणुसे यांनी जोरदार पणे पोलीस आणि महापालिका प्रशासनावर प्रहार केले. सातारा रस्त्यावरील पद्मावती ते वाळवेकर लौन्स दरम्यान विनाकारण सायकल ट्रैक मुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने हा सायकल ट्रैक काढून टाकावा अशी मागणी यांनी केली .याशिवाय शहरातील एल इ डी च्या जाहिराती अपघातांना निमंत्रण देत असल्याचा आरोप बागवे यांनी केला तर कात्रज कोंढवा रस्त्याचा प्रश्न सोडवा हो अशी विनंती रेणुसे यांनी केली पहा आणि ऐका नेमके यांनी काय म्हटले आहे …