पुणे शहरातील पोलीस मध्यवर्ती मोटार परिवहन कार्यशाळेच्या कवायत मैदानावर हा सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सहआयुक्त सुनील रामानंद, याच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माथूर म्हणाले की, पोलीस दल हे समाजाच्या सेवेसाठी असून नागरिकांना जास्तीत जास्त मदत करणे आणि तत्परतेने सेवा देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. त्यासाठीच राज्यसरकारने हे पाऊल उचलले असून त्यानुसारच ही वाहने पोलीस दलात दाखल झाली आहेत. पोलिसांनी या वाहनांचा वापर चांगल्या रितीने करून पोलीसदलाचा नाव लौकिक राखला जाईल अशीच वर्तणूक पोलीस कर्मचारी आणि अधिका-यांनी ठेवावी, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.