पुणे-पालिकेचाच तोही एकच संगणक वापरून त्यावरून 5 निविदा भरण्यात आल्या, आणि निविदांप्रकरणी अनामत रक्कम भरताना एकाच खात्यातून ड्राफ्ट देण्यात आला ,सर्व निविदा धारकांचा पत्ता एक असणे , ठेकेदार म्हणून बोगस इसम उभा करणे,अशा तक्रारीनंतर राष्ट्रीय सपर्धा आयोगाने 6 ठेकेदारांना पावणे दोन लाखापासून ते ३४ लाखापर्यंत दंड केला .या सर्व ठेकेदारांना काळ्या यादीत टाका अशी मागणी कॉंग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांनी केली आहे .
महापालिका हद्दीतील घनकचरा व्यवस्थापना संदर्भात महापालिकेचे घनकचरा प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने टेंडर -निविदा मागविल्या होत्या .याप्रकरणी राष्ट्रीय स्पर्धा आयोगाने कारवाई केल्यानंतर आज अरविंद शिंदे यांनी हि मागणी केली आहे .