मोहम्मद बावाजी यांना उद्योजकता विकास श्रेणी पुरस्कार प्रदान
पुणे – ग्लोबल एज्यूकेशन समिट २०१६ नुकतीच दिल्ली येथे पार पडली. यावेळी पुण्याचे मोहम्मद बावाजी यांना आउटस्टॅडिंग अचिव्हमेंट इन ट्रेनिंग (आत्रप्रेनरशिप डेव्हलपमेंट) आणि कन्सलटिंग (करिअर अॅण्ड बिझनेस) विभागामध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आला. माजी केंद्रीय मंत्री सुबोध कांत साहाय यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान केला गेला. यावेळी मनुष्यबळ विकास राज्यमंत्री (शालेय शिक्षण आणि साक्षरता) उपेंद्र कुशवाह, राज्यमंत्री सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (एमएसएमई) मंत्रालय गिरीराज सिंग, भाजपा राष्ट्रिय प्रवक्ता आणि माजी केंद्रीय मंत्री सय्यद शहनवाज हुसेन आदी उपस्थित होते.
लीडर्स स्पीक ग्लोबल एज्यूकेशन समिट हे बाजारीकरण, व्यापारीकरण रोखण्यासाठी सुरू केलेले मॅगझिन आहे. जुन्या पत्रकारीतेमधील त्रुटी दूर नव्या पद्धतीने काम या मॅगझिनद्वारे केले जाते. प्रशासन, शिक्षण आणि आरोग्य या विषयावर आधारीत उदयोन्मुख समस्या, सर्वोत्तम पद्धती यावर चर्चा केली जाते.
या मसिटमध्ये अनेक भागधारक त्यांचे अनुभव, नवनवीन कल्पनांचे आदानप्रदान करतात. यामध्ये शिक्षण, विकास कार्यक्रम, सामाजिक प्रशन आदी मुद्यांवर चर्चा केली जाते.
विविध क्षेत्रातील आंतराष्ट्रीय तज्ज्ञ मंडळी, सेक्टर कौशल्य परिषदेचे अधिकारी, आयटीआय महाविद्यालयातील लोकप्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, एमडी, संचालक आदी सहभागी झाले होते.