पुणे-भीमआर्मी हि आंबेडकरी चळवळीतील आक्रमक संघटना असून युवक , विद्यार्थी , महिला वर्ग तसेच आंबेडकरी विचारांच्या तमाम कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याने संपूर्ण महाराष्ट्र भर पोहचत आहे . येणाऱ्या काळात सर्व सामान्य जनतेच्या मूलभूत प्रश्नावर लढा उभा करणार असल्याचे मत भीमआर्मी संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ यांनी संघटनेच्या विविध शाखांच्या उदघाटन प्रसंगी व्यक्त केले .
पुणे शहरातील कात्रज , आंबेगाव , सूर्या चौक , वारजे माळवाडी , कामगार पुतळा , विश्रांतवाडी , मुंढवा , केशवनगर तसेच मंगळवार पेठ या विविध भागात भीमआर्मी संघटनेच्या शाखांची उद्घाटने झाली . त्यावेळी भीमआर्मी संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख दत्ता पोळ बोलत होते .
यावेळी भीमआर्मी संघटनेचे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे , महिला आघाडी महाराष्ट्र प्रमुख कविता पवार यावेळी शाखांची उदघाटने झाली . यावेळी भीम आर्मी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस विजय कांबळे , संघटक मनोहर वावळे , कैलास पगारे , केतन पगारे , ऍड. रत्नाकर ढावरे , नेहा शिंदे , वर्षा काळे , सर्जेराव कांबळे , राजू कांबळे, अमोल मेडामे , सुनील गायकवाड, प्रिती पिल्ले, राहुल शिंदे , सीताराम गंगावणे व अन्य संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते .
या कार्यक्रमास उपस्थितांचे स्वागत व सूत्रसंचालन प्रदीप कांबळे यांनी केले . तर आभार बाळू गायकवाड यांनी मानले . यावेळी भीमआर्मी संघटनेचे सुनील बेंगळे , विवेक सावंत , नागेश गायकवाड , राकेश साबळे , शरद घोडके , दीपक बलाढे , आप्पा आखाडे , मुकेश गायकवाड , विक्की जावळे , सचिन शेरखाने आदी उपस्थित होते .