पुणे-
जागतिक मानवाधिकार दिनानिमित मानवाधिकार प्रखर शोध मोहीम सोसायटीच्यावतीने यंदाच्या वर्षीचा विशेष पुरस्कार ख्रिस्तोपर राजमनी यांना शाल , श्रीफळ व पुष्पगुछ देउन देण्यात आला . ख्रिस्तोपर राजमनी हे शालोम ख्रिश्चन असोसिएशनचे अध्यक्ष असून त्यांनी गरजू महिलांना मदत , तसेच चर्चचे नूतनीकरण , रंगकाम , दफनभूमीमध्ये रंगरंगोटी , पाण्याची व्यवस्था , रुग्णांना रुग्णवाहिका , नाताळनिमित्त सामूहिक प्रभू येशू ख्रिस्ताची जन्मोत्सवाची गाण्याच्या स्पर्धा , रुग्णांना आर्थिक व वैद्यकीय मदत त्यांनी केली आहे . त्यानिमित्ताने त्यांना विशेष पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले . या कार्यक्रमात पीटर डिक्रूज , विल्सन डॅनियल यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी मानवाधिकार प्रखर शोध मोहीम सोसायटीचे राष्ट्रीय अध्यक्ष अभिमन्यू गवळी , राष्ट्रीय महासचिव राजेश गवळी ,पुणे शहर अध्यक्ष अशोक जगताप , निवृत्त लेफ्टनंट जनरल आर. आर . निभोरकर , उपजिल्हाधिकारी सय्यद सूर्यवंशी ,आमदार जगदीश मुळीक , पोलीस उपायुक्त प्रसाद अक्कानुरू , जॉन मुनावर सिंग , रिटा मारियन , सुनील रॉय , अँजलिस अँथोनी , येसू नंदन , जेम्स पॉल , रिबेलो जेकब , डेव्हिस दास आदी मान्यवर उपस्थित होते .