पुणे-पेसापालो फाऊंडेशनचीची कार्यकारिणी मंडळाची बैठक पुणे शहरात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीशभाऊ बापट यांच्या सुनबाई स्वरदा बापट यांच्यासमवेत झाली . या बैठकीत पुणे शहरात नोव्हेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या दहाव्या पेसापालो या खेळाचे विश्व् चषक स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविण्यात आले .
हि बैठक पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या जनसंपर्क कार्यालयात संपन्न झाली . महाराष्ट्र पेसापालो फाऊंडेशनच्या अध्यक्षा स्वरदा बापट , नगरसेवक महेश लडकत , कार्याध्यक्ष चेतन पागवाड , कार्यकारिणी सदस्य मार्क भस्मे , संतोष पाटील , रणजित देशपांडे , आंतरराष्ट्रीय पेसापालो खेळाडू किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते .
या बैठकीत पुणे शहरात नोव्हेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या दहाव्या पेसापालो या खेळाचे विश्व् चषक स्पर्धेचे आयोजन करण्याचे ठरविले . त्या संदर्भात खेळाच्या आयोजनबदल चर्चा करण्यात आली . या विश्व् चषक स्पर्धेमध्ये १२ देशामधील ५०० खेळाडू सहभागी होतील . यामध्ये प्रामुख्याने भारत , फिनलँड , स्वित्झरलँड , स्वेडन , जर्मनी , ऑस्ट्रेलिया , अमेरिका , रशिया , नेपाळ , भूतान , श्रीलंका आदी देशामधील खेळाडू सहभागी होतील . आशिया व आफ्रिकेमधील इतर देशाची खेळाडू सहभागी होतील असे महाराष्ट्र पेसापालो फाऊंडेशनचे कार्याध्यक्ष चेतन पागवाड यांनी सांगितले .
या खेळाचा सुरुवात लावरी पिखाला यांनी सन १९०२ साली फिनलँड येथून केली . हा खेळ फिनलँड या देशाचा राष्ट्रीय खेळ आहे . व सन १९५२ साली फिनलँड हेलसिंकी येथे झालेल्या ऑलम्पिकमध्ये या खेळाचे प्रात्यशिक दाखविण्यात आले . तसेच या खेळात फिनलँड ऑलम्पिक व शालेय स्तरावर याचे सामने होतात प्रीमियर लीगचे आयोजन दरवर्षी केले जाते . या मध्ये युरोपियन व आशियायी देशातील खेळाडू सहभाग होत असतात . हा खेळ बेसबॉल व सॉफ्ट बॉल या खेळासारखा एका संघात १२ खेळाडू असतात . त्यातील प्रत्यक्ष ९ खेळाडू खेळतात , ३ राखीव खेळाडू असतात . तो संघ जास्त धावा मिळवतो तो संघ विजयी ठरतो . भारतीय पेसापालो महासंघाची स्थापन सन २०१० साली महाराष्ट्रातून करण्यात आली . याची प्रात्यशिक स्कुल गेम फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मान्यतेने राजनंदन गाव (छत्तीसगड) येथे सन मे २०१७ साली करण्यात आले .