पुणे- महेश मांजरेकर आणि काही मातब्बर मराठी चित्रपटांना अनुदान देण्यास विरोध दर्शवित असताना अनेकवेळा दिसून आले आहे . …. काल येथे प्रसिद्ध कवी आणि माजी आमदार यांनी मात्र मराठी चित्रपटांना हिंदीशी स्पर्धा करायची असेल तर शासनाने त्यांना किमान ४० लाखाचे अनुदान द्यायला हवे अशी मूळ कल्पना हिंदी मधील ख्यातनाम आणि दिवंगत अभिनेते सुनील दत्त यांनीच मांडली होती . आणि त्यांच्यामुळेच आज मराठी चित्रपटसृष्टीत चित्रपटांची बहार आली आहे हे नमूद केले .
अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या चित्रकर्मी पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते . अभिनेते मनोज जोशी ,पुष्कर श्रोत्री.,लीला गांधी,जयमाला इनामदार,सुहासिनी देशपांडे ,मृणाल कुलकर्णी ,चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज भोसले , संजय ठुबे ,मिलिंद लेले आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला .सुमित कॅसेट चे सुभाष परदेशी, दिग्दर्शक कांचन नायक,लेखक श्रीनिवास भणगे,संगीतकार प्रभाकर जोग यांच्यासह 17 कलावंतांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
अभिनेत्री वर्षा उसगावकर, पूजा पवार , अभिनेता मयूर लोणकर ,अभिनेत्री सुरेखा कुडची ,वैशाली जाधव,तेजस्विनी लोणारी आदी कलाकारांच्या नृत्यविष्काराने सोहळ्यात रंगत आणली .अथर्व कर्वे,योगेश सुपेकर ,शर्वरी जेमनीस,सुशांत शेलार यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .
पहा या सोहळ्याची एक व्हिडीओ झलक …..