मेट्रो तर्फे कर्मचाऱ्यांना हेल्मेट वितरण
पुणे– मेट्रो सर्व्हीसेस ( कॅप्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि फायनान्स सेंटर 58 अब्ज युरो जर्मन रिटेल कॉग्लोंमेरेट- मेट्रो एजी) ने पावसाळ्याचे स्वागत करत सुरक्षेच्या दृष्टीकोणातुन आपल्या सर्व कर्मचार्यांना हेल्मेट वितरण केले. ह्यावेळी त्यांनी कर्मचार्यांना प्राण वाचविण्यासाठी हेल्मेटचे काय महत्व आहे हे देखील सांगितले.
हेल्मेट परिधान करण्याबाबत लोकांमध्ये महिती आणि जागरुकता आणण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
डायरेक्टर मनदीप सिंग आणि लता गुप्ता यांनी कर्मचार्यांना वाहन चालवताना हेल्मेट घालण्याचे प्रोत्साहन दिले. याचबरोबर त्यांनी कामाच्या ठिकानी कर्मचार्यांच्या सुरक्षिततेची उच्चतम मानके आणि वचनबद्धत्ता स्पष्ट केली.