पुणे :- पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील विशेषता पर्वती दर्शन, शिवदर्शन, दत्तवाडी, एरंडवणा, हेल्थ कॅम्प, जनवाडी, भवानी पेठ येथील नागरीकांनी महसुल मंत्री यांच्या दि.15 जुन 2018 च्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने तसेच पुनवर्सन प्राधिकरणाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांच्या दि.7 डिसेंबर 2018 च्या बैठकीत दिलेल्या निर्देशाचे अनुषंगाने पानशेत पुरग्रस्त वसाहतीतील नागरीकांच्या मिळकत पत्रिकांमध्ये शासनाकडील अनुदानीत आदेशामधील क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची नोंद झाली आहे अशा मिळकत पत्रिकेवरील संबधीतांनी जिल्हा अधिक्षक भुमिअभिलेख पुणे यांच्या कार्यालयातअर्ज सादर केल्यास दुरुस्तीची कार्यवाही अवलंबणेत येईल, संपर्कासाठी जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख, पुणे बंगला नं.1, एअरपोर्ट रोड,समता नगर, बदामी चौक, येरवडा, पोस्ट ऑफिसच्या मागे, येरवडा पुणे, इमेल आयडी dslr.pu_mh@gov.in, dslr_pune@yahoo.in ,दुरध्वनी क्र.०२०-२६६८४६५८ वर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक भुमि अभिलेख राजेंद्र गोळे यांनी केले.
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे व्यवसाय प्रशिक्षण
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय पुणे मार्फत चालू अर्थिक वर्षात अनुसूचित जातीतील महार, नव बौध्द, बुरुड,भंगी, हिन्दु-खाटीक इत्यादी जातीतील पात्र उमेदवारास टु व्हीलर सर्व्हिस सेंटर, ब्युटी पार्लर, डिप्लोमा, जी.एस.टी, संगणक प्रशिक्षण, फेब्रिकेशन/ वेल्डीग, वाहन चालक मोबाईल रिपेंरींग, फॅशन डिझायनिंग, नेफ्रीजेटर ॲड ऐअर कंडीन्शर रिपेंरीग, मोटार रिवायडींग, रिटेल मॅनेजमेंट इत्यादी व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या व्यवसाय प्रशिक्षणासाठी जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनिंग कार्ड, शाळा सोडल्याचा दाखला, इत्यादीसह जिल्हा कार्यालय, 424 मंगळवार पेठ, लडकत पेट्रोल पंपाजवळ पुणे. दुरध्वनी क्र.020-26121295 येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत बनसोडे यांनी केले आहे.