पुणे : काल उरी ( जम्मू ) येथे भारतीय लष्करावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात देशाचे रक्षण करताना १७ जवन शाहिद झाले. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने बालगंधर्व चौक येथे आज बुधवार दुपारी साडेबारा वाजता आंदोलन करण्यात आले.
भारतीय जवानांवर सातत्याने पाकिस्तानकडून भ्याड हल्ले होत आहेत. पाकिस्तानच्या या भ्याड हल्ल्याचा जाहीर निषेध आणि ५६ इंच सीना आहे असे सांगणारे पळपुटे भाजप सरकारचाही जाहीर निषेध करण्यासाठी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने खासदार , शहराध्यक्ष वंदना चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ,महापौर प्रशांत जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.
यावेळी ,महापौर प्रशांत जगताप, सभागृह नेते बंडू केमसे , नगरसेवक महेंद्र पाठारे , अनिल टिंगरे, सचिन दोडके तसेच अशोक राठी , शैलेश बडदे, निलेश निकम , रुपाली चाकणकर . इकबाल शेख , कासमभाई शेख, अझीम गुडाखूवला योगेश वऱ्हाडे,संजय गाढे ,सुरेश बांदल, मिलिंद वालवंडकर ,गौरी जाधव, मनोज पाचपुते, अच्युत लांडगे , संतोष ढोक , निखील बटवाल आदी कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते.