पुणे- महापालिकेतील सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांचा आज वाढ दिवस ,आणि त्यांच्या लग्नाचाही 25 वा वाढदिवस …या निमित्ताने शहराच्या राजकारणात आज भिमालेंची ‘हवा ‘ दिसून आली. त्यांना खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुभेच्छ्या दिल्याने भिमालेंच्या कार्यकर्त्यांमध्ये विशेष चैतन्य पसरले होते .अनेक कार्यकर्ते त्यांना भावी आमदार संबोधित असताना , भिमालेंच्या वाढदिवसानिमित्त शहराच्या राजकारणात आज पसरलेली हवा पुढील राजकारणाला वेगळी दिशा तर देणार नाही ना ? या प्रश्नावर काही समीक्षकांच्या भुवया उंचावलेल्या दिसल्या .