गरजू ह्रदयरोगींवर अन्जिओप्लास्टी, बाईपास सर्जरी मोफत शिबिर
पुणे : लायन्स इंटरनॅशनल क्लब तलवडे प्राईड व ओम मेडिकल फाऊंडेशन च्या सहकार्याने मावळ, लोणावळा भागातील गोरगरीब जनते च्या निरोगी जीवनासाठी लोणावळा येथील नारायणीधाम मंदीरात रविवार दिनांक 28 मे रोजी सकाळी 10 ते 2 वाजे पर्यंत मोफत रोगनिदान महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहेत. या रोगनिदान महाआरोग्य शिबिरात गरजू व गोरगरीब पेशंटची शरीरातील रक्ताचे प्रमाण, साखरेची तपासणी, छातीची पट्टी व इतर आजारांची मोफत तपासणी तज्ञ डॉक्टरांकडून केली जाईल. या शिबिरात तपासणी केलेल्या गोरगरीब आणि उपचार करण्यास असमर्थ असणार्या केशरी व पिवळे राशनकार्ड धारकांची राजीवगांधी जीवनदायी आरोग्य योजनेत अंतर्गत भोसरी येथील मल्टीस्पेशलिटी, सुपरस्पेशलिटी ओम हॉस्पिटल मध्ये बायपास सर्जरी, एन्जिओप्लास्टी, डायलिसिस,वॉल्व बदलणे, आय वी.सी.फिल्टर, पुरूषग्रंथी, मुतखडा, थायरॉईड व इतर अनेक आजारावर सर्व शस्त्रक्रिया तज्ञ डॉक्टरांकडून मोफत विनामूल्य केली जाईल. या भागातील गोरगरीब जनतेने या महाआरोग्य शिबिरात आपली पूर्ण तपासणी मोफत करून या शिबिराचे लाभ घ्यावी असे आवाहन ओम मेडिकल फाऊंडेशनचे डॉक्टर अशोक अग्रवाल यांनी केले. या आरोग्य शिबिराच्या व राजीवगांधी जीवनदायी आरोग्य योजनाच्या माहिती करिता सचिन मो.- 8888825601, डॉ.अमर मो.- 7888027254 किंवा नम्रता ला मो.-7774049690 वर संपर्क साधवा.