पुणे- आता शहरभर एलईडीवाॅल वर जाहिरात करण्याचा सपाटा एका कंपनीने सुरु केला असून महापालिकेतील एका अधिकाऱ्याच्या संगनमताने हा मोठा घोटाळा होतो आहे . पदपथावर उभारण्यात येणारे हे एलईडीवाॅल सर्व नियम ,पालिकेचे धोरण पायदळी तुडवून कोणाच्या आशीर्वादाने कोण उभारत आहे ? याची माहिती पुणेकरांपुढे येणे गरजेचे आहे . त्या समवेत पद्पाथासाठी महापालिकेचे सर्व मान्य धोरण काय आहे, नियामवली काय आहे ? या सर्वाची उकल करून हे प्रकरण चव्हाट्यावर आणण्याची मागणी होते आहे .. यासंदर्भात नगरसेवक अविनाश बागवे यांनी काल झालेल्या स्थायी समितीमध्ये आवाज उठविला … याबाबत बागवे काय म्हणाले ते थेट त्यांच्याच शब्दात ऐका ….