नगरसेविका सौ स्वप्नाली सायकर यांचा मदतीचा हात
पुणे-प्रभाग क्र ९ मधील कु आरती सुनील भालेराव हिची भारतीय सॉफ्टबॉल संघात निवड झाली असून ७ वी एशियन जुनियर वुमेन्स सॉफ्टबॉल चम्पियनशीप स्पर्धा क्लार्क फिलिपिन्स या देशात होणार आहे. या स्पर्धेत निवड झालेल्या कु. आरती सुनील भालेराव हिची आर्थिक परिस्थती बेताची असून तिला मदत म्हणून बाणेर बालेवाडी परिसरातून अनेक संस्थानी आर्थिक मदत केली आहे स्वराज्य प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्री प्रल्हाद सायकर व नगरसेविका सौ स्वप्नाली सायकर यांच्या वतीने आर्थिक मदतीचा चेक आज देण्यात आला याप्रसंगी नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती गणेश कळमकर,श्री अक्षय बालवडकर,श्री पोळीचे पाटील श्री आनंदा कांबळे उपस्थित होते.
अप्लुया परिसरात अनेक असे खेळाडू आहेत परंतु आर्थिक परिस्थितीमुळे या खेळाडूंना पुढे जाता येत नाही भविष्यात प्रभागातील अशा खेळाडूंना आर्थिक हात मिळावा व त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी प्रयत्नशील राहील.या परीसरातील माझ्यासह अनेक सामाजिक संस्थानी,नागरिकांनी या उदोयन्मुख खेळाडूस 1 लक्ष रुपयापर्यंत मदात केली असून तिच्यापुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.