पुणे-शिवाजीनगर येथील शेतकी कॉलेज येथे मेट्रो भूमिगत कामाचा शुभारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे भूमिपूजन पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते झाले. यावेळी मेट्रोच्या अधिकार्यांनी भूमिगत मेट्रोचा मार्ग, उपलब्ध मशिनरिज ची माहिती उपस्थितांना दिली. पालकमंत्री गिरीश बापट यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रो साठी दिलेल्या निधी व त्यांनी केलेल्या सहकार्याबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे मेट्रोचे पुढील प्रस्ताविंत मार्गची पूर्तता करून संपूर्ण पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार करण्याची आपली योजना असल्याचे पालकमंत्री बापट यांनी सांगितले. स्थानिक आमदार विजय काळे यांनी पुणेकरांना पुढील दिड वर्षामध्ये मेट्रो मधून प्रवास करायला मिळेल असा विश्वास व्यक्त केला. नगरसेवक आदित्य माळवे यांनी मेट्रो चे काम लवकरात लवकर होण्यासाठी महापालिकेच्या परवानग्या व वृक्ष प्राधिकरण विषयक कामे जलदगतीने करून देण्याचा मानस व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी पालकमंत्री बापट, आमदार विजय काळे, उपमहापौर सिद्धार्थ धेंडे, नगरसेवक आदित्य माळवे, नगरसेविका सोनाली लांडगे, नगरसेविका राजश्री काळे, नगरसेवक महेश लडकत, नगरसेवक अजय खेडेकर, माजी नगरसेवक दत्ता खाडे, मधुकर मुसळे, शाम सातपुते, संदीप काळे, रवींद्र साळेगावकर, अभिनव सावंत, विशाल धुमाळ, शैलेंद्र मोरे, गौरव गोटे, प्रदीप मोरे, मनोज नलावडे, नरेश राउत, बाळासाहेब अमराळे, मुकुंद पुराणिक, सतीश मराठे, अपर्णा गोसावी, भावना शेळके, शाम काची, दिलीप शेळके, नंदा मोरे, दत्ता खंडागळे, वैशाली काणे, किरण बदामी, सुप्रिया खैरनार, सुधीर आल्हाट, प्रभाकर पवार, अपर्णा कुऱ्हाडे, गणेश बगाडे, संतोष लांडगे, शिवाजी डोंगरे, श्री. सोरटे, प्रसाद कुलकर्णी, श्री. रिसबूड, रोहित शेळके, गोविंद भोगी, लक्ष्मण लोखंडे, दिलीप काळे, संदीप गायकवाड, ऐश्वर्य देशपांडे यांच्यासह मेट्रोचे अधिकारी उपस्थित होते.