तळजाई टेकडीवर…एक पणती शहिदांसाठी ! आबा बागुल यांचा उपक्रम
पुणे- देशाच्या सीमेवर खडा पहारा देताना प्राणांची आहुती देणाऱ्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी तळजाई टेकडीवर हजारो पणत्या प्रज्वलित करण्यात येणार असल्याची माहिती माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली.
आबा बागुल म्हणाले कि, तळहातावर प्राण घेऊन आपल्या जवानांचा देशाच्या सीमेवर खडा पहारा आहे म्हणूनच आपण सारे निर्धास्त जीवन जगत आहे. पण वेळप्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या जवानांप्रती कृतज्ञता व्यक्त करताना त्यांच्या कुटुंबियांसमवेत आपण सर्वजण आहोत यासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यानुसार आम्ही दिवाळीची सुरुवात होणाऱ्या वसुबारसेच्या दिवशी सायंकाळी सहा वाजता तळजाई टेकडीवर एक पणती शहिदांसाठी या उपक्रमाद्वारे हजारो पणत्या प्रज्वलित करून शहीद जवानांना आदरांजली वाहणार आहोत. देशासाठी शहीद होणाऱ्या जवानांसाठी एक पणती घेऊन पुणेकरांनी बुधवार दि. २६ ऑकटोबर रोजी सायंकाळी ६ वाजता तळजाई टेकडीवर यावे असे आवाहनही आबा बागुल यांनी केले आहे.