Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

पोलिसांच्या दोन भन्नाट शौर्यकथा!! – झी युवा वर…

Date:

आजपर्यंत झी युवावरील “शौर्य- गाथा अभिमानाची” या कार्यक्रमात आपण महाराष्ट्र पोलिसांचे शौर्य आणि त्यांची गुन्हे सोडवण्याची क्षमता किती उत्तुंग पातळीवर आहेत हे पाहिलेत.  या वर्षाच्या शेवटी, पोलीस इतिहासातील पहिले एन्काउंटर आणि विविध देशात अनेक गुन्हे करून फरार असलेला इंटरनेशनल क्रिमिनल अश्या दोन अतिशय उत्कृष्ट शौर्य कथा आपल्याला पाहायला मिळणार आहेत. या आठवड्यात शुक्रवार ३० डिसेंबरला पोलिसांचा निर्भीड चेहरा, निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त इसाक बागवान यांनी कुविख्यात गुंड मन्या सुर्वे याचे केलेले एन्काउंटर आणि शनिवार ३१ डिसेंबरला निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त मधुकर झेंडे यांनी कशाप्रकारे शिताफीने ‘बिकिनी किलर. चार्ल्स शोभराजला अटक केली हि रंजक कथा आपल्याला रात्री ९ वाजता दाखवण्यात येणार आहे.  महाराष्ट्र पोलिसांनी लाखो करोडो गुन्ह्यांचा तपास केला आहे आणि असंख्य गुन्हेगारांना गजाच्या आड सुद्धा केले आहे. वर्षाच्या शेवटी झी युवा आपल्या प्रेक्षकांसाठी या अतिशय रंजक आणि अतुलनीय शौर्याच्या दोन भन्नाट शौर्यकथा घेऊन येत आहेत.

अनेक वेळा गुन्हेगारी कथा, गुन्हेगाऱ्यांची नाव, ही लोकांच्या मनात खोलवर राहतात.  मन्या सुर्वे आणि चार्ल्स शोभराज हि दोन्ही नावे गुन्हेगारी जगतातील मोठी नावे, पण या नावांच्याच्याही वर या गुन्हेगारीचा खातमा आणि पकडणारी नावे आहेत, ती म्हणजे निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त इसाक बागवान आणि निवृत्त पोलीस सहाय्यक आयुक्त मधुकर झेंडे. या पोलीस अधिकाऱ्यांनी ज्याप्रमाणे त्यांच्या बुद्दीचातुर्याने, गुप्तहेरांच्या साखळीच्या मदतीने, त्यांच्या साहसाने, आपल्या प्राणांची बाजी लावत या गुन्हेगाऱ्यांना संपवले ते गौरवणीय आहे. गुन्हेगारीला चेहरा नसतो असं म्हणतात. पण असाही एक चेहरा होता कि ज्याने १० वर्षे पोलीसांच्या हातावर तुरी देत मुंबईत आपली दहशत माजवली, ऍसिड बल्ब, माऊझर बॉम्ब अशी प्राणघातक हत्यारे बाळगणारा मन्या खुल्लेआम बँका लुटायचा, खंडण्या गोळा करायचा. ७० व ८० च्या दशकातील अंडरवर्ल्डचा हा चेहरा म्हणजे गुन्हेगारी जगतातील मूर्तिमंत क्रौर्य होते. हा मुंबई पोलिसासाठी एक डोकेदुखी बनला होता. मन्याला पकडण्यासाठी पोलिस जंग-जंग करीत होती मात्र, मन्या हाताला लागत नव्हता. अखेर मुंबई सीआयडीने मन्याच्या प्रेयसीमार्फत त्याचा माग काढला व त्याचा काटा काढण्याचे ठरविले.या मन्याला ११ जानेवारी, १९८२ इसाक बागवान यांनी दुपारी १:३० वाजता वडाळा बस डेपो आणि आंबेडकर कॉलेजच्या परिसरात इतर पोलीस अधिकाऱयांच्या सहाय्याने घेरले आणि त्याचा भारतीय गुन्हेगारी जगतातील , पहिला लाईव्ह एनकाऊंटर केला .पोलीस इतिहासातील पहिला एन्काऊंटर करतानाचे  इसाक बागवान आणि त्यांचे अतुलनीय शौर्य आपल्याला ३० डिसेंबर ला रात्री ९ वाजता दाखवण्यात येणाऱ्या भागातून पाहायला मिळेल .

 

चार्ल्स शोभराज हा हा विविध देशात अनेक गुन्हे करून फरार असलेला इंटरनेशनल क्रिमिनल होता. भारत देश पाहण्यासाठी आलेले परदेशी पर्यटक हे त्याचे मुख्य टार्गेट असायचे. अय्याशीसाठी स्वतःच्या रूपाची आणि बोलण्याची छाप परदेशी तरुणींवर पाडून त्यांना आपल्या जाळ्यात ओढून चार्ल्स आपली भूक भागवत असे. आणि नंतर त्यांचा खून करीत असे. पैश्यासाठी वाट्टेल त्या थराला जाणारा हा गुन्हेगार बेकायदा मार्गाने शस्त्र आणून तो गुन्हे करण्यात वाकबदार होता. विकृत स्वभावाच्या या गुन्हेगाराने गुन्हे देशात केले आणि तिथून निसटून सुद्धा आला. साऱ्या जगाला जेरीस आणणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या मुसक्या आवळून महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणाऱ्या, महाराष्ट्राचा वाघ मधुकर झेडे यांनी ज्या प्रकारे सापळा लावून पकडले, हि रंजक कथा आपल्याला ३१ डिसेंबर ला रात्री ९ वाजता पाहायला मिळेल.

 

शौर्य – गाथा अभिमानाची या मालिकेचे दिग्दर्शन सावधान इंडियाचे दिग्दर्शक – जास्वन्द एंटरटेनमेंट चे सचिन मोहिते, तर लेखन दगडी चाळ सिनेमाचे गाजलेले लेखक अजय ताम्हाणे, कलादिग्दर्शक विवेक देशपांडे, छायांकन शाहिद आणि संगीत प्रसिद्ध संगीतकार अमितराज यांनी केले आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

कम्युनिटी बॉयलरचे अग्रणी स्टीमहाऊस इंडियाने 425 कोटी रु. उभारण्यासाठी सेबीकडे UDRHP केला सादर

भारतामधील कम्युनिटी बॉयलर प्रणालीचे अग्रणी स्टीमहाऊस इंडिया लिमिटेडने त्यांचा अपडेटेड ड्राफ्ट...

प्रबोधन, प्रशिक्षण व संशोधन ही लोकशाही समृद्धीची त्रिसूत्री

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सभागृहातील चर्चेअंती निर्मित कायद्यांमध्ये जनमाणसाचे प्रतिबिंब...