झी युवाचा “सरगम” हा कार्यक्रम सध्या प्रेक्षकांच्या पसंतीला उतरला आहे.त्यांचे नियोजित कार्यक्रम सोडून सध्या या कार्यक्रमाकडे पाहण्याचा ओघ वाढत आहे . या बुधवारी आणि गुरुवारी सरगम या कार्यक्रमाचे दोन एपिसोड्स , संगीत क्षेत्रातील तरुण आणि प्रसिद्ध संगीतकार अभिजीत पोहनकर यांच्या संगीतावर आधारित आहेत . अभिजीत पोहनकर हे संगीत क्षेत्राच्या नवीन युगातील एक महत्वाचं नाव आहे . संगीत निर्माता , संयोजक , गायक , पियानो वादक अश्या अनेक गोष्टींमुळे अभिजीत पोहनकर आजच्या तरुण संगीतकारांच्या नावातील एक वेगळे नाव आहे . अभिजीत पोहणकरांच्या रक्तातच संगीत ठासून भरलेले आहे .ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजय पोहनकर यांचे सुपुत्र असलेले अभिजीत पोहनकर यांनी जग प्रसिद्ध संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांच्याकडून संगीत वाद्द्यांचे भारतीय संगीत शैलीत शिक्षण घेतले आहे आणि मुख्य म्हणजे अभिजीत संपूर्ण भारतात एकमेव संगीतकार आहेत जे भारतीय शात्रीय संगीत कीबोर्ड वर वाजवतात . अश्या अप्रतिम संगीतकाराचे संगीत या आठवड्यात २६ आणि २७ एप्रिल बुधवार आणि गुरवार रात्री ९ वाजता सरगममध्ये प्रेक्षकांना आहे .
सरगम या कार्यक्रमात अभिजीत पोहनकर यांच्या दोन एपिसोड्स मध्ये घेई छंद , खेळ मांडला , मी राधिका , उघड्या पुन्हा , माझे जीवन गाणे , मी रात टाकली , इंद्रायणी काठी तुम्हावर केली मी मर्जी बहाल अलबेला साजन ही आणि अशी गाणी पाहायला मिळणार आहेत . त्याचप्रमाणे अभिजीत पोहंणकरांचा एक पिआनो स्पेशल परफॉर्मन्स सुद्धा होईल . अभिजीत पोहनकर यांच्या एपिसोड मध्ये पंडित कल्याणजी गायकवाड शौनक अभिषेकी ,कृष्णा बोंगाणे , सारा , सायली तळवलकर , अनुजा झोकारकर, , पूजा गायतोंडे आणि श्रीनिधी घटाटे यांनी गाणी गायली आहेत . त्याचप्रमाणे ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजय पोहनकर यांचाही एक अप्रतिम अविष्कार आपल्याला ऐकायला मिळेल .
सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत .”सरगम” या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. “सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.