झी युवा वाहिनीद्वारे मराठी टेलिव्हीजनवर २२ ऑगस्ट २०१६ पासून एक नवे पर्व.सुरु झाले . संपूर्ण महाराष्ट्र वाट बघत असलेल्या या वाहिनीच्या दिमाखदार उद्घाटन सोहळ्या नंतर झी युवा परिवाराचा अविभाज्य भाग बनलेल्या मालिका – बन मस्का , फ्रेशर्स , लव्ह लग्न लोचा , इथेच टाका तंबू , श्रावणबाळ , युवागिरी , शौर्य आणि हल्ली नवीन सुरु झालेले कार्यक्रम प्रेम हे आणि सरगम यांनी प्रेक्षकांना एक नाविन्यमय अनुभव नक्कीच दिला. प्रेक्षकांचा मराठी टेलिव्हिजन बघण्याचा अनुभव समृद्ध करण्यासाठी अश्या विविध स्वरूपाचे कार्यक्रम झी युवावर दाखवले जात आहेत . झी युवावर प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारे विषय तर नक्कीच आहेत, पण अनेक नवेनवे विषय सुद्धा आहेत जे याआधी कधीच मराठी प्रेक्षकांनी पाहिले नाहीत . झी युवा ते ते त्यांच्यासमोर नवीन नवीन प्रयोगाद्वारे आणत आहेत .
झी युवावर या पुढे येणाऱ्या नवीन कार्यक्रमांमध्ये एका नव्या रुपात, नव्या ढंगात नवीन विचारांना प्रोत्साहन देणारे, भविष्याकडे बघण्याचा नवीन दृष्टीकोन देणारे आणि आजच्या प्रेक्षकवर्गाशी साधर्म्य साधणारे कार्यक्रम याचे अजोड त्रिकुट एवढेच नव्हे तर नाते-संबंधाना नव्याने बघण्याची सुवर्णसंधी देणारे कार्यक्रम मराठी प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहे. झी युवावरील कार्यक्रमांद्वारे प्रेक्षकवर्गाला दोस्ती – यारी, मज्जा – मस्ती, हळूवार उमलणारं प्रेम, या सगळ्याच प्रकारची मेजवानी बघायला मिळणार आहे. या मालिकांमध्ये कुठलेही डाव पेच नाही, व्हिलन नाही, टेन्शन नाही तर फक्त निखळ आनंद देणारे कार्यक्रम जे मनोरंजन देतील वीदाउट एनी टेन्शन फक्त झी युवावर. तर सध्या झी युवावर आणखी एक नवीन मालिका दाखल होणार आहे मालिकेचे नाव आहे “फुलपाखरू ” प्रेम फुलपाखरासारखे असते स्वतःचे फुल ते स्वतःच शोधते अशी सुंदर वाक्यरचना असेलेला या मालिकेचा प्रोमो तरुणाईत अतिशय वायरल झाला आहे ज्यात वैदेही म्हणजेच अभिनेत्री ऋता दुर्गुळेच्या निरागस प्रेमाची गोष्ट असणार आहे , हे अतिशय सुंदर रित्या दाखवण्यात आलेले आहे . अजूनही या मालिकेमध्ये वैदेहीच्या प्रेमात नक्की कोण आहे हे दाखवण्यात आलेले नाही त्याचप्रमाणे इतर कोण कोणते कलाकार आहेत हे आपल्याला नवीन प्रोमोद्वारे लवकरच समजतील . ही मालिका २४ एप्रिल पासून सोमवार ते शुक्रवार , संध्याकाळी ७:३० वाजता झी युवावर आपल्याला पाहायला मिळेल.