संगीताचा आस्वाद घेणे कधी काळी खिशात पैका खुळखुळत असेल तरच शक्य होते. आकाशवाणीने व मग दूरदर्शनने आम आदमीला कानसेन बनविले पण त्यालाही काही मर्यादा होत्याच. संगीताचा घरबसल्या व हवे तेव्हा आस्वाद घेण्याची जी साधने होती ती मध्यमवर्गीयाच्या आवाक्याबाहेरच होती. ग्रामोफोन, कॅसेट प्लेयर, वॉकमन व एम.पी. 3 प्लेयर , आय-पॉड या प्रवासात संगीत अभिजनांपासून जनांपर्यंत सर्वत्र झिरपायला लागले. नेट वर सुरवातीला एम.पी. 3 गाणी अगदी सहज उपलब्ध होती पण ती वाजविण्यासाठी लागणारी उपकरणे परवडण्याजोगी नव्हती. स्वामीत्व कायद्याचा बडगा उगारला गेल्याने , एम.पी. 3 माध्यमातुन संगीत उपलब्ध करून देणार्या अनेक साइटस भूमिगत झाल्या ! म्हणजे दात होते तेव्हा चणे खायला पैसे नव्हते व आता दात पडल्यावर चणे खायची ऐपत आहे अशी स्थिती संगीताचे वेडे असलेल्यांची झाली. जुनी गाणी मिळत नाहीत व रिमिक्सचा मारा मात्र चालूच आहे. एम.पी.3 या प्रकारातली जुनी मराठी गाणी अनेक साइटसवर उपलब्ध आहेत पण ती फक्त ऐकायला मिळतात, उतरवून घेता येत नाहीत ! काही वेब-साइटस गाणी ऐकायची असतील तर नोंदणी करायची सक्ती करतात, तर काही वेब-साइट्स गाण्याची काही सेकंदाची झलक ऐकवून दामाजी काढा असे बजावतात !
झी युवावरील सरगम हा कार्यक्रम सध्या अनेक रेकॉर्ड्स मोडत ; प्रेक्षकांच्या मनात घर करत आहे . संगीत वेड्यांसाठी झी युवा दिनांक ५ एप्रिल बुधवारी आणि ६ एप्रिल गुरुवारी रात्री ९ वाजता “ओल्ड इझ गोल्ड” नावाने सुंदर गाण्याची पर्वणी घेउन येत आहे . या दोन्ही एपिसोड्सची संकल्पना कमलेश भडकमकर यांची असून या भागांमध्ये रवींद्र साठे , मधुरा कुंभार , निहिरा जोशी , अर्चना निपाणकर , अमोल बावडेकर , जयदिप बगवाडकर आणि प्रियांका बर्वे या नावाजलेल्या गायकांनी अक्षरशः जुन्या गाण्यांची अतिशय सुंदर मैफल बसवली आहे . सरगमच्या पहिल्या भागाची सुरवात लख लख चंदेरी या गाण्याने सुरवात होईल . त्यानंतर लटपट लटपट , खेड्यामध्ये घर कौलारू , ऐरणीच्या देवा , मळ्याच्या मळ्यांमंदी आम्ही ठाकर ठाकर …. अशी गाणी असतील तर दुसरा भाग मनाच्या धुंदीत लहरीत ये ना , कौशल्याचा राम , काल देहाची , कोणाच्या खांद्यावर , या डोळ्यांची , आईनं दुपारी , छबीदार छबी आणि बहू असतो सुंदर अशी हमखास मनात घर करणारी अप्रतिम गाणी गाणारा आहेत .
सरगम हा कार्यक्रम कॉटन किंग प्रस्तुत करीत असून स्किनसिटी सह प्रायोजक आहेत आणि महा केशामृत स्पेशल पार्टनर आहेत .”सरगम” या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जवाबदारी उर्मिला कोठारे यांनी उचलली आहे. आदिनाथ कोठारे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि निर्माते आहेत. ह्या कार्यक्रमाचे शीर्षक गीत शंकर महादेवन यांनी गायले असून मंदार चोळकर याने ते लिहिले आहे आणि सिद्धार्थ आणि सौमिल यांनी संगीतबद्द केले आहे. “सरगम” हा कार्यक्रम दर बुधवार आणि गुरवार रात्री ९ वाजता झी युवावर पाहता येईल.

