झी टॅाकीजवर दादा कोंडके विशेष

Date:

मराठी चित्रपटांसाठी दादा कोंडके यांचे योगदान अमूल्य आहे. बहुरंगी व्यक्तिमत्व असलेल्या दादा कोंडकेंना रसिकांचेही भरभरून प्रेम मिळाले. आजही दादा कोंडकेंचा मोठा चाहता वर्ग आहे. त्यांच्यावरच्या याच प्रेमापोटी  झी टॅाकीज मंगळवार १४ मार्चला दादा कोंडके विशेष साजरा करणार आहे.

मंगळवार १४ मार्चला दिवसभर झी टॅाकीजवर दादा कोंडकेच्या काही खास चित्रपटांचा आस्वाद प्रेक्षकांना घेता येणार आहे. सकाळी ९.०० वाजता ‘गनिमी कावा’, दुपारी १२.०० वाजता ‘मला घेऊन चला’, सायंकाळी ६.०० वाजता ‘पळवा पळवी’ हे चित्रपट प्रेक्षकांना पाहता येतील. या चित्रपटांबरोबरच दुपारी ३.०० वाजता ‘दादागिरी’ या विशेष कार्यक्रमाअंतर्गत दादा कोंडके यांच्या कारकीर्दीचा पट उलगडला जाईल.

मराठी चित्रसॄष्टीला सुवर्णकाळ दाखवणारे मराठी शोमॅन दादा कोंडके व त्यांचे अस्सल मराठी मातीशी इमान राखणारे गावरान भाषेतील इरसाल विनोदी चित्रपट हा एक अमूल्य ठेवा आहे. त्यांच्या चित्रपटांइतकीच सरस असणारी त्यातील गीते आज ५० वर्षानंतर देखील तितकीच श्रवणीय आहेत. झी टॅाकीजवरील दादा कोंडके विशेष दिवसामुळे स्मरणरंजनाचा अनोखा अनुभव प्रेक्षकांना मिळणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

तुळशीबाग राम मंदिरात श्रीराम जन्म सोहळा थाटात साजरा

श्री रामजी संस्थान तुळशीबागच्या वतीने आयोजन ; उत्सवाचे २६५ वे...

भगवान परशुरामांच्या पुण्यातील एकमेव मंदिराच्या निर्मितीला प्रारंभ 

पुणे:ब्राह्मण महासंघ च्या वतीने  पुण्यातील शिवाजी रस्त्यावरील शाहू चौकातील...

महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांचे संवर्धन ही सर्वांची जबाबदारी:डॉ. सचिन जोशी

श्री जंगली महाराज देवस्थान ट्रस्ट, पुणेच्या वतीने व्याख्यान पुणे :...

डिजिटल छळही आता लैंगिक छळ, विनयभंगाच्या श्रेणीत; विधेयक मंजूर:महिला सुरक्षेसाठी फडणवीस आक्रमक

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेने बुधवारी भारतीय न्याय संहिता विधेयक २०२६...