Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

‘उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्कार अपंगमित्र नसीमादीदी हुरझूकांना जाहीर

Date:

समाजासाठी देत असलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल महाराष्ट्राच्या कानाकोप-यातील काही कर्तृत्ववान महिलांचा तसेच एका सामाजिक संस्थेला दरवर्षी झी मराठीतर्फे उंच माझा झोका पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. कोल्हापूर येथे ‘हेल्पर्स फॉर हॅंडीकॅप’ या संस्थेच्या माध्यमातून अपंगांच्या पुनर्वसनासाठी कार्य करणा-या अपंगमित्र नसीमादीदी हुरझुक यांना यंदाचा जीवन गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यासोबतच ग्रामस्वछतेचे ध्येय बाळगून त्यासाठी कार्य करणा-या ‘भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला’ सर्वोत्कृष्ट संस्थेचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. येत्या १९ ऑगस्टला हा पुरस्कार प्रदान सोहळा डोंबिवली येथे संपन्न होणार आहे.

मनोरंजन आणि प्रबोधन यांची उत्कृष्ट सांगड घालणा-या झी मराठी या महाराष्ट्रातील अग्रेसर आणि अत्यंत लोकप्रिय मराठी वाहिनीने गेल्या पंधरा वर्षांत विविध दर्जेदार कार्यक्रमांचा नजराणा आपल्या रसिकांना दिला. दर्जेदार कार्यक्रमांची परंपरा राखत झी मराठीने सतत वेगवेगळे सामाजिक उपक्रम देखिल राबवले आहेत. याच परंपरेतून उंच माझा झोका या पुरस्काराची संकल्पना गेल्या तीन वर्षांपासून झी मराठीकडून राबवण्यात येत आहे. समाजातील विविध क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी करणा-या एका सामाजिक संस्थेलादेखिल या पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. कोकणात गृहिणीचं आरोग्य, पर्यावरण आणि रोजगार याबरोबरच ग्रामस्वच्छता आणि ग्रामविकासाचे ध्येय घेऊन काम करणारे ध्येयनिष्ठ दांपत्य म्हणजे डॉ. प्रसाद देवधर आणि डॉ. हर्षदा देवधर. या डॉक्टर दाम्पत्याने आपला डॉक्टरी पेशा सांभाळत असतानाच समाजसेवेचं आणि ग्रामविकासाचं व्रत अंगिकारलं आणि गावाच्या विकासाठी भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानची स्थापना केली. आज भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानने बायोगॅस प्रकल्प राबवत जिल्ह्यातील सुमारे पाच हजार घरे धूरमुक्त केलीयत. बायोगॅस प्रकल्पाबरोबरच ग्रामविकासाच्या विविध योजना राबवत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील डॉ. प्रसाद देवधर आणि डॉ. हर्षदा देवधर यांच्या भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानला यावर्षीचा सामाजिक संस्थेचा उंच माझा झोका पुरस्कार जाहीर झाला आहे. तर कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अपंगांच्या पुनर्वसनासाठी गेली चार दशके अथक परिश्रम घेणा-या नसीमा हुरझूक यांना यंदाच्या उंच माझा झोका जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. शालेय जीवनात उत्तम खेळाडू असलेल्या आणि नंतर केवळ आजारामुळे अपंगत्व आलेल्या नसीमा हुरझूक. मात्र या अपंगत्वावर मात करून नसीमादीदीनी समाजातील अनेक अपंगांना छातीशी कवटाळले आणि त्यांना स्वावलंबी करण्यासाठी, त्यांच्या जगण्याला आकार देण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं. आज अनेक अपंगांच्या आयुष्यात नसीमादीदींनी आशेचे किरण आणलेत.

झी मराठीच्या उंच माझा झोका पुरस्कारांसाठी ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विजया राजाध्यक्ष आणि मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. स्नेहलता देशमुख या तीन मान्यवरांनी पुरस्काराच्या निवड समितीचे मानद सल्लागार म्हणून मोलाची कामगिरी बजावली. येत्या १९ ऑगस्ट २०१६ ला हा पुरस्कार प्रदान सोहळा डोंबिवली येथे सावित्रीबाई फुले सभागृह येथे संपन्न होत असून २८ ऑगस्टला हा सोहळा झी मराठीवर प्रसारित होणार आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापालिकेतील दोन कर्मचाऱ्यांना ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका; एकाचा मृत्यू

पुणे : महापालिकेच्या इमारतीमध्ये आज दिवसभरात दोन कर्मचाऱ्यांना हृदयविकाराचा...

पुतिन यांची कार चालता-फिरता किल्ला आहे, बसल्या बसल्या करू शकतात अणुबॉम्ब हल्ला,ती सोडून पुतीन बसले मोदींच्या कार मध्ये…

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतात पोहोचताच सुरक्षा प्रोटोकॉल...

पुतिन भारतात पोहोचताच PM मोदींनी घेतली गळाभेट

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारतात आले आहेत. पंतप्रधान मोदींनी...

शिवसेनेने फुंकले महानगरपालिका निवडणुकीचे रणशिंग!

दत्त जयंतीच्या शुभमुहूर्तावर उमेदवारी अर्ज वाटपाची सुरुवात पुणे – पुणे...