समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा प्रवास उलगडणारा द रिअल हिरो कथा समृद्धीच्या हा कार्यक्रम झी मराठी वाहिनीवर नुकताच सुरु झाला आहे. या कार्यक्रमाची निर्मिती व सूत्रसंचालन अशी दुहेरी जबाबदारी अॅड. समृद्धी पोरे यांनी सांभाळली असून कार्यक्रमाच्या पहिल्या भागात ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी आपला जीवनप्रवास उलगडला. आता दुसऱ्या भागात प्रख्यात कायदेतज्ञ अॅड. उज्ज्वल निकम यांचा धाडसी प्रवास उलगडणार आहे.
अॅड. उज्ज्वल निकम यांचा आजवरचा प्रवास, आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन, त्यांनी लढवलेले खटले अशा नानाविध गोष्टींचा पट या मुलाखती दरम्यान उलगडणार आहे. उज्ज्वल निकम यांच्या पोतडीतील समृद्ध अनुभवांचा खजिना जाणून घ्यायचा असेल तर रविवार १६ जुलैला सकाळी ११.३० वा. प्रसारित होणारा हा कार्यक्रम अवश्य पाहा.