पुणे :
पुणे महापालिका आयोजित ‘जतन’ या ‘पुणे यूथ फेस्टिव्हल’चा सोमवारी शनिवारवाडा येथे महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते आणि खासदार अॅड.वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत समारोप झाला. समारोप प्रसंगी महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी अंकुश काकडे, नगरसेवक बाळासाहेब बोडके, बाबुराव चांदेरे, प्रशांत जगताप, रवींद्र माळवदकर, रवी चौधरी, राकेश कामठे तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
पुणेकर नागरिकांनी या फेस्टिव्हलला चांगला प्रतिसाद दिला. जतन 2016 पुणे युथ फेस्टिव्हलमध्ये बॅन्ड कॉम्पिटिशन (बॅटल ऑफ द बॅन्डस ) खुप उत्साहाने झाली, त्याचबरोबर शनिवारवाडा येथे बाजीराव व काशीबाई अवतरले ते पारंपरिक वेषभूषा (ड्रेस टु इंप्रेस)च्या माध्यमातून अवघा शनिवारवाडा वेगवेगळ्या वेशभूषा नी रंगीत आणि प्रफुल्लीत झाल्याचे दिसले. वक्कृत्व स्पर्धा (मुँह खोलो… कुछ तो बोलो), बेस्ट ऑऊट ऑफ वेस्ट स्पर्धा (कबाड से जुगाड), पथनाट्य स्पर्धा (नुक्कड नाटक), संभाजी पार्क येथे होईल तर बॅण्ड स्पर्धा (बॅटल ऑफ बॅण्डस्), ट्रॅडिशनल अॅण्ड इंडो-वेस्टर्न फ्यूजन ऑफ (ड्रेस टू इंम्प्रेस ट्रॅडिशनल स्पर्धा), लोकनृत्य (डान्स फॉर पुणे) अशा कार्यक्रमांची रेलचेल होती





